लायसन्सची मुदत संपली, अपाइंटमेंट घेतली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:10+5:302021-06-10T04:11:10+5:30

गेल्या दोन दिवसांत २२ आणि ३० असे एकूण ५२ परवाने देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कळवण्यात आले ...

License expired, did you make an appointment? | लायसन्सची मुदत संपली, अपाइंटमेंट घेतली का?

लायसन्सची मुदत संपली, अपाइंटमेंट घेतली का?

Next

गेल्या दोन दिवसांत २२ आणि ३० असे एकूण ५२ परवाने देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

दुचाकी असो अथवा चारचाकी आधी कच्चा तथा प्रशिक्षणार्थी वाहन चालविण्याचा परवाना, नंतर पक्का परवाना दिला जातो. हा परवाना म्हणजेच लायसन्सचे ठरावीक मुदतीनंतर नूतनीकरण देखील करण्यात येते. मात्र, गतवर्षी कोरोनाचे संकट आले आणि या सर्वच कामांचा खोळंबा झाला. नागरिकांना बाहेर देखील पडता येत नसल्याने आणि राज्य सरकारने कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याचे आदेश दिल्याने महापालिकेने नागरिकांच्या लायसन्सला मुदतवाढ दिली होती. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने गेल्या सोमवारपासून लायसन्स देणे तसेच वाहन नोंदणी अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. अर्थात लायसन्ससाठी अपाइंटमेंट घ्यावी लागणार आहे. अर्थात पुढील त्रास वाचवण्यासाठी अशाप्रकारे लायसन्स काढून घेणे आवश्यक ठरणार आहे.

इन्फो...

अशी घ्या अपाइंटमेंट

लर्निंग लायसन्सकरिता (शिकाऊ अनुज्ञप्ती) अर्ज करणाऱ्या उमेदवारास ‘परिवहन’ या संकेतस्थळावर स्वतःचा अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल. यामुळे अर्जदाराच्या ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आरटीओला गरज भासणार नाही.

इन्फो...

कोटा नाही; पण....

वाहन लायसन्सची कामे तुंबल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आधी कोटा ठरवण्यात आला होता, म्हणजेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी कोटा ठरवून देण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, नंतर मात्र आता अशाप्रकारचा कोटा न ठरवताच काम सुरू झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कोट...

सध्या पूर्ण क्षमतेच्या मनुष्यबळावर काम सुरू झालेले नाही. लायसन्स काढण्यासाठी दैनंदिन वाहनांची वर्गवारी किंवा कोटा ठरवलेला नाही. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार काम सुरू करण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने काम काढण्यात आले.

- भरत कळसकर, आरटीओ, नाशिक

इन्फो...

तीन दिवसांत पन्नासहून अधिक वाहनांची नोंदणी

कोरोनामुळे वाहनांचे शोरूम बंद असल्याने खरेदीदेखील बंद होती. तसेच अनेक वाहनांची नोंदणीही खोळंबली होती. मात्र, आता अनलॉक सुरू होताच वाहनांची नोंदणी सुरू झाली असून, तीन दिवसांत सुमारे पन्नास वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

Web Title: License expired, did you make an appointment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.