नाशिक जिल्ह्यातील पाच रेशन दुकानांचे परवाने रद्द, चार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 07:26 PM2020-04-24T19:26:08+5:302020-04-24T19:28:52+5:30

रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे उलंघन होत असल्याने अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Licenses of five ration shops in Nashik district canceled, four suspended | नाशिक जिल्ह्यातील पाच रेशन दुकानांचे परवाने रद्द, चार निलंबित

नाशिक जिल्ह्यातील पाच रेशन दुकानांचे परवाने रद्द, चार निलंबित

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील रेशन दुकानांवर कारवाईपुरवठा विभागाकडून पाच दुकानांचे परवाने रद्दचार दुकानांवर निलंबनाची कारवाई

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या काळात नागरिकांना अन्नधान्य वाटपाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविली आहे. परंतु, रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे उलंघन होत असल्याने अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील धान्य वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाचे कटाक्षाने लक्ष असून, धान्य वितरण प्रणालीत अनियमितता अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर नियंत्रणासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाने विशेष पथक निर्माण के ले आहे. या पथकाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत नाशिक तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ९६ येथे निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे धान्य वितरण अधिकारी यांच्या कक्षेतील दुकान क्रमांक १६७, येवला तालुक्यातील दुकान क्रमांक १३२ व दिंडोरी तालुक्यातील दुकान क्रमांक ११५ या ठिकाणी विशेष पथकाने कारवाई करून संबंधित दुकानांचे निलंबन केले असून, नाशिक तहसील यांच्या कक्षेतील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५ सह धान्य वितरण अधिकारी नाशिक यांच्या कक्षेतील दुकान क्रमांक ५, १६२, १२४ व ५६ या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यातील नाशिक तहसील यांच्या कक्षेतील एकलहरे यथेली स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या धडक मोहिमेदरम्यान, जिल्ह्यातील एकूण नऊ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून,  त्यांच्याकडून सुमारे १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे. 

Web Title: Licenses of five ration shops in Nashik district canceled, four suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.