व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसुलीस विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:26 AM2018-06-19T00:26:02+5:302018-06-19T00:26:02+5:30
व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
नाशिक : व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीचा आधार घेत महापालिका क्षेत्रातील व्यापारी-उद्योजकांकडून परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर महापालिकेत स्वतंत्र परवाना विभागदेखील तयार केला जाणार असून, परवाना नोंदणी व नूतनीकरणासाठी आॅनलाइन सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु महापालिकेचा हा निर्णय व्यावसायिक व उद्योजकांची पिळवणूक करणारा असल्याचा आरोप करीत या शुल्क वसुलीस ‘आप’ने विरोध दर्शविला आहे. आपचे जगबीर सिंग, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, नितीन शुक्ल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.
पालिकेच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार बोकाळेल, अशी शंका आपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.