शिक्षिकेने वाचविले पक्ष्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:54 PM2019-05-03T17:54:25+5:302019-05-03T17:55:10+5:30
मालेगाव मध्य : सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून माणसांबरोबरच पक्ष्यांच्याही जिवाची लाहीलाही होत आहे. पाण्याअभावी तहानलेल्या पशुपक्ष्यांना प्राण सोडावे लागत आहेत; परंतु अशाच तहानेने व्याकूळ होऊन भोवळ आल्याने जमिनीवर पडलेल्या पक्ष्याची तहान एका शिक्षिकेनेभागवून त्याला नवीन जीवन दिल्याने सदर शिक्षिकेतील माणुसपणाचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळी ११ वाजता नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे येथील जि. प. शाळेच्या आवारात आला. पाण्याअभावी एक पक्षी भोवळ आल्याने उडताना खाली पडला. सुदैवाने समोरून जात असलेल्या शिक्षिकेने समय सुचकता दाखवत हाताच्या ओंजळीतून पाणी पाजले. काही वेळातच या पक्षाला पूर्वस्थितीत आला व भुर्रकन उडून गेला. यामुळे अध्ययनाबरोबरच संवेदन शिलतेचे प्रदर्शन देत समाजास एक संदेश दिला.
नांदगावपासून ६ ते ७ कि.मी. अंतरावर पिंप्राळे हे छोटेसे गाव आहे. येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका नलिनी जगन्नाथ सांगळे ह्या आपल्या दैनंदिन कामानिमित्ताने सकाळी ११ वाजता शाळेच्या आवारात दाखल झाल्या. त्यांच्या समोरच एक पक्षी झाडावरुन खाली पडल्याचे पाहून श्रीमती सांगळे यांनी पक्षास उचलन घषतले. तो बेशुद्ध असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी समय सुचकता दाखवत त्वरित पाणी आणत हाताच्या ओंजळीने त्यास पाणी पाजले. अवघ्या काही वेळातच पक्षी शुद्धीवर आला व का काही कळायच्या आतच भुर्रकन उडून गेला.