बालदिनी चिमुकल्याला जीवदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 03:14 PM2019-11-14T15:14:52+5:302019-11-14T15:15:01+5:30
कळवण (नाशिक)-खेळता खेळता सुमारे २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यास यंत्रणेला यश आले आहे.
कळवण (नाशिक)-खेळता खेळता सुमारे २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यास यंत्रणेला यश आले आहे. तालुक्यातील नवी बेज शिवारात रामचंद्र महाजन यांच्या शेतात मका कापणीसाठी मध्यप्रदेशमधील मजूर आलेले होते. त्यांच्यातील रितेश नवलसिंग हा पाच वर्षाचा चिमुकला खेळत खेळत आज सकाळी गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेल्या बोअरवेलमध्ये पडला. त्याला वाचविण्यासाठी नवीबेज येथील स्थानिक यंत्रणेने व पोलीस यंत्रणेने युद्ध पातळीवर सर्वस्तरावरील यंत्रणा कामास लावली. बालदिनी अडीच तासात बालकाला वाचविण्यात यश आले. घटनास्थळी आमदार नितीन पवार, रविंद्र देवरे, सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया, तहसीलदार बी ए कापसे, पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी धाव घेत मदतकार्याला सहकार्य केले. पोलीस व आरोग्य विभागाने तत्परता दाखवली. देविदास पवार घनश्याम पवार यतीन पवार चंद्रकांत पवार यांचे प्रयत्न यशस्वी झाले. चिमुकल्या रितेशवर कळवण येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.