सनातन वैदिक धर्मसभेतर्फे आंबेकर यांना जीवनगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:07 AM2018-06-12T01:07:06+5:302018-06-12T01:07:06+5:30
सनातन वैदिक धर्मसभा संस्थेमार्फत अधिकमासानिमित्ताने विश्वकल्याणासाठी करण्यात आलेल्या दोनदिवसीय श्री विष्णू महायागाची मंत्रोच्चारात सांगता करण्यात आली. तसेच या कार्यक्र मानंतर नाशिकचे ज्येष्ठ अग्निहोत्री वैदिक बाळशास्त्री आंबेकर गुरुजी यांना सनातन वैदिक धर्मसभेतर्फे उपस्थित साधू-महंत व मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंचवटी : सनातन वैदिक धर्मसभा संस्थेमार्फत अधिकमासानिमित्ताने विश्वकल्याणासाठी करण्यात आलेल्या दोनदिवसीय श्री विष्णू महायागाची मंत्रोच्चारात सांगता करण्यात आली. तसेच या कार्यक्र मानंतर नाशिकचे ज्येष्ठ अग्निहोत्री वैदिक बाळशास्त्री आंबेकर गुरुजी यांना सनातन वैदिक धर्मसभेतर्फे उपस्थित साधू-महंत व मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापचंद्र महाराज, अनिल महाराज जोशी, महंत भक्तिचरणदास महाराज, सनातन वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष भालचंद्रशास्त्री शौचे, उपाध्यक्ष अॅड. भानुदास शौचे, डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकर, माधवदास राठी, नरहरी उगलमुगले, चंद्रशेखर क्षीरसागर, अजित गर्गे, हेरंब गोविलकर, डॉ. स्नेहा पुजारी, हेमंत धर्माधिकारी, रवींद्र राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते. आंबेकर गुरुजी हे महाराष्ट्र राज्यातील मोजक्या अग्निहोत्री वैदिकांपैकी एक वैदिक असून, अग्निनारायणाची शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांच्या घराण्यात उपासना सुरू आहे म्हणून त्यांनाही ज्येष्ठ उपासक म्हणून गौरविण्यात आले. विष्णू यागाचे यजमान अजय देशपांडे, कौस्तुभ शौचे, नीलेश पाराशरे, पद्माकर जोशी, अरविंद सरोदे, नंदकुमार फुलंब्रीकर, वैभव झंवर, श्रीपाद सिन्नरकर हे होते. मुकुंद मुळे, उपेंद्र देव, संतोष मुदगल, विक्र म आंबेकर आदींनी धार्मिक विधी सांगितले.