हरणाच्या पाडसाला वाटसरूंकडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:25+5:302021-03-30T04:11:25+5:30
भारम येथून योगेश गोराणे आणि सहकारी कामानिमित्त नांदगाव येथे जात आसताना त्यांना खरवंडी ते भारम रोडलगत एक श्वान ...
भारम येथून योगेश गोराणे आणि सहकारी कामानिमित्त नांदगाव येथे जात आसताना त्यांना खरवंडी ते भारम रोडलगत एक श्वान हरणाचे पाडस तोंडात धरून चालले असताना दिसले. गोराणे यांनी आपला ट्रक थांबवून श्वानाचा पाठलाग केला आणि त्याच्या तावडीतून पाडसाची सुटका केली. पाडसाला काही ठिकाणी जखमाही झाल्या होत्या. त्यांनी सदर घटनेची माहिती ममदापूर राखीव काळवीट वन्यजीव संवर्धन पथकाचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवली. वन कर्मचारी दत्तू गोसावी यांच्या ताब्यात सदर पाडसाला देण्यात आले.
पाणीटंचाई काळात वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे नेहमीचे चित्र आहे. ममदापूर संवर्धन क्षेत्र झाले, दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्ची होतो. मात्र, वन्यजीवांचे चारा-पाण्याच्या शोधात होणारे मृत्यू वनविभागाला रोखता आलेले नाहीत. वनविभागाने वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- गणेश गायकवाड, अध्यक्ष, ममदापूर राखीव (काळवीट) वन्यजीव संवर्धन पथक, ममदापूर
===Photopath===
290321\29nsk_29_29032021_13.jpg
===Caption===
पाडसाला जीवदान