जीवन म्हणजे निसर्गाशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:12+5:302020-12-16T04:31:12+5:30
दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा ...
दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा एक भाग माणूस असतो, म्हणून माणसाने निसर्ग संतुलन राखले पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण टिकवून ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी व्याख्यानात केले.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत वाघ यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी वाघ म्हणाले की, अंधश्रद्धा, रुढी-परंपरांमुळे माणसाची अधोगती होते. त्यामुळे माणसाच्या विकासासाठी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण जर शास्त्रशुद्ध असेल तर माणसाचा विकास शक्य होतो. शिक्षण घेताना माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. अशा प्रकारचे विचार करण्याचे स्वातंत्र्य विचारवंत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फारसे मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस परिपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येकाला आत्मशोध घेता आला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय सानप यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा.दिलीप कुटे, डॉ.महादेव कांबळे, प्रा.डॉ.धीरज झाल्टे, प्रा.राजेंद्र डोईफोडे, प्रा.डॉ. अरविंद केदारे, प्रा.डॉ.संतोष भैलुमे, प्रा.तुकाराम भवर, प्रा.वैशाली गांगुर्डे, प्रा.पंकजा अहिरे, डॉ.रुपाली सानप, प्रा.योगेश डंबाळे, प्रा.सीताराम भोये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाणे यांनी केले तर प्रा.नाना चव्हाण यांनी आभार मानले.