युवकाने वाचविले बुडणाºया तरु णीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:27 PM2020-02-09T18:27:11+5:302020-02-09T18:29:48+5:30

पेठ : तालुक्यातील बेलपाडा येथे एका खोल विहिरीत पडलेल्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आदिवासी युवकाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणाºया तरु णीचे प्राण वाचविले.

The life of a drowned young girl rescued by a youth | युवकाने वाचविले बुडणाºया तरु णीचे प्राण

बेलपाडा येथील तरु णी बुडालेली विहीर.

Next
ठळक मुद्देबेलपाडा : प्रसंगावधान राखल्याने वाचला जीव

पेठ : तालुक्यातील बेलपाडा येथे एका खोल विहिरीत पडलेल्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आदिवासी युवकाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणाºया तरु णीचे प्राण वाचविले.
याबाबत ग्रामस्थांकडून समजलेली माहिती अशी की, बेलपाडा येथील तरु णीने किरकोळ कारणावरून जीव देण्यासाठी गावानजीकच्या विहिरीत उडी घेतली. विहिरीजवळ शेतात काम करणाºया हरिदास भुसारे या युवकाला आवाज आल्याने त्याने विहिरीकडे धाव घेत डोकावून पाहिले असता तरुणी पाण्यात बुडत असल्याचा प्रकार लक्षात आला. हरिदास भुसारे याने क्षणाचीही विलंब न लावता खोल विहिरीत उडी घेतली व दोराच्या साह्याने बुडणाºया तरुणीला आधार देत तिला वाचविले. भुसारे यांच्या या कार्याची खबर ग्रामस्थांना लागल्याने गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत हरिदास भुसारे यांचे कौतुक केले.

मी शेतात काम करीत असताना जवळच असलेल्या विहिरीत आवाज झाल्याचे ऐकू आल्याने त्या दिशेने धावत गेलो असता गावातील तरुणी पाण्यात बुडत असल्याचे दिसले. क्षणाचाही विलंब न लावता मी पाण्यात उडी घेऊन तिचा जीव वाचविला. कोणाला तरी जीवदान दिल्याचे समाधान वाटले.

- हरिदास भुसारे, बेलपाडा, ता. पेठ

 

Web Title: The life of a drowned young girl rescued by a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.