दारूसाठी आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:30 PM2018-12-26T16:30:28+5:302018-12-26T16:30:58+5:30
नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचा लोखंडी फुकणी व लाकडी ठोकळ्याने खून करणा-या मुलास जिल्हा न्यायाधीश एस़एस़नायर यांनी बुधवारी (दि़२६) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ अशोक लक्ष्मण वटाणे (२७, रा़ टिटवे, ता़ दिडोरी जि़नाशिक) असे खून करणाºया मुलाचे नाव आहे़ या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील बेघर वस्तीत शांताबाई लक्ष्मण वाटाणे या मुलगा अशोक व सुनासह राहत होत्या़ मात्र मुलगा अशोक यास दारु पिण्याचे व्यसन असल्याने तो कामधंदा न करता सतत आईकडून पैसे मागत असे़ त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नीही त्यास सोडून गेली होती़ १५ एप्रिल २०१५ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अशोक याने नेहेमीप्रमाणे दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागीतले़ त्यास पैसे देण्यास नकार देताच अशोकने घरातील चुल फुंकण्यासाठी वापरली जाणारी फुंकणी व लाकडी ठोकळ्याने आई शांताबाईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा खून केला़ या प्रकरणी काशिनाथ नथु पवार (रा़टिटवे, ता़ दिंडोरी जि़नाशिक़) यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या खुनाचा तपास वणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़डीख़ोडवे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
जिल्हा न्यायाधीश एस़एस़नायर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील विद्या जाधव यांनी सात साक्षीदार तपासून पोलिसांनी जमा केलेले परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार या आधारे दोषारोप सिद्ध केले़ या पुराव्यांच्या आधारे आरोपी अशोक वाटाणे यास न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़