वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:06 PM2018-12-05T16:06:26+5:302018-12-05T16:07:31+5:30

नाशिक : वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून त्यांचा खून करणारा मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी. देशमुख यांनी बुधवारी ...

Life imprisonment | वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे या खटल्यात सात साक्षीदार तपासलेआरोपी बोरगे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

नाशिक : वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून त्यांचा खून करणारा मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी. देशमुख यांनी बुधवारी (दि.५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जॉनी मधुकर बोरगे (२८,अजिंक्य व्हीला, शिवशक्ती नगर, सिडको) असे शिक्षा सुुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले.

सिडकोतील शिवशक्तीनगरमध्ये मधुकर तुकाराम बोरगे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. त्यांचा मुलगा जॉनी मधुकर बोरगे यास गांजाचे व्यसन होते यातून तो नेहमी आई-वडिलांना शिवीगाळ करीत असे. 29 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास मधुकर बोरगे घराच्या ओट्यावर खुर्ची टाकून बसले होते. यावेळी त्यांचा मुलगा जॉनी याने लाथ मारून वडिलांना खाली पाडले. यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी पोलीस हवालदार विष्णू हळदे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

एपीआय शिवाजी आहिरे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश जीपी देशमुख यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी सात साक्षीदार तपासले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी अंजना गोजरे व निर्मला जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश देशमुख यांनी आरोपी बोरगे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.