खुनातील आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 10:54 PM2017-08-01T22:54:39+5:302017-08-01T22:55:54+5:30

पंचवटीतील हिरावाडी परिसरात वॉचमनची नोकरी करणारा सर्जेराव उन्हाळे (२३) याने राहत्या खोलीत पत्नी सीमाचा गळा आवळून खून केल्याची घटना २०१५ साली उघडकीस आली होती. या गुन्ह्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने उन्हाळे यास दोषी ठरवून जन्मठेप व दोन हजाराच्या दंडाची शिक्षा मंगळवारी (दि.१) सुनावली.

Life imprisonment is life imprisonment | खुनातील आरोपीला जन्मठेप

खुनातील आरोपीला जन्मठेप

Next
ठळक मुद्देमध्यरात्री पलंगाच्या सहाय्याने ओढणी बांधून गळा आवळल्याचे सकाळी उघडकीस वॉचमनची नोकरी करणारा सर्जेराव उन्हाळे (२३) याने राहत्या खोलीत पत्नी सीमाचा गळा आवळून खून केल्याची घटना

नाशिक : पंचवटीतील हिरावाडी परिसरात वॉचमनची नोकरी करणारा सर्जेराव उन्हाळे (२३) याने राहत्या खोलीत पत्नी सीमाचा गळा आवळून खून केल्याची घटना २०१५ साली उघडकीस आली होती. या गुन्ह्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने उन्हाळे यास दोषी ठरवून जन्मठेप व दोन हजाराच्या दंडाची शिक्षा मंगळवारी (दि.१) सुनावली.
मखमलाबाद रस्त्यावरील एका बंगल्यावर वॉचमन म्हणून उन्हाळे कुटुंबासमवेत राहात होता. तो आणि त्याची पत्नी सीमा उन्हाळे मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, उन्हाळे हा मद्यप्राशन करून पत्नीला मारहाण करत पैसे देण्यासाठी दबाव वाढवित होता. त्याने पत्नीला पंचवटीमध्ये माहेरी दीड वर्ष सोडून पोबारा केला होता. काही महिन्यांनी पुन्हा येऊन माहेरच्या लोकांची समजूत काढत त्याने पत्नीचा स्वीकार केला व तिला घरी घेऊन गेला. शहरात मोलमजुरीची कामे मिळत नसल्याचे सांगून पत्नीला घेऊन त्याने पुणे गाठले. मात्र वीस दिवसांनंतर पुन्हा पत्नीसह सर्जेराव उन्हाळे शहरात आला. सासºयाने त्याला मखमलाबादरोडवर एका बंगल्याच्या वॉचमनची नोकरी मिळवून दिली. तेथील खोलीत तो पत्नीसह राहात होता. काही दिवसांनंतर त्याने राहत्या घरात सवयीप्रमाणे पत्नीला मारहाण व भांडण करून मध्यरात्री पलंगाच्या सहाय्याने ओढणी बांधून गळा आवळल्याचे सकाळी सासरे घरी आल्यानंतर उघडकीस आले होते. सासºयाने त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी फरार उन्हाळे यास अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी देत नंतर मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली होती. या गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या पाच सुनावण्यांमध्ये खटल्याचा निकाल दिला. न्यायालयापुढे सरकारी वकील विद्या जाधव यांनी युक्तिवाद करीत पाच साक्षीदार तपासले. शिंदे यांनी उपलब्ध पुरावे व प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारे संशयित आरोपी उन्हाळे यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Life imprisonment is life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.