प्रेयसीच्या मुलाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:18+5:302021-03-27T04:15:18+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात २५ ते २६ फेब्रुवारी १८ च्या रात्री मिशन मळा परिसरातील भारती डॅनियल रेडी ...

Life imprisonment for the murderer of his beloved son | प्रेयसीच्या मुलाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

प्रेयसीच्या मुलाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात २५ ते २६ फेब्रुवारी १८ च्या रात्री मिशन मळा परिसरातील भारती डॅनियल रेडी यांच्या भाड्याच्या खोलीत आरोपी सोनुबाई उर्फ सोनाली सुधाकर थोरात (२७) व तिचा प्रियकर साहील उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जगप्रसाद चतुर्वेदी (३१, रा. खंडोबा चाळ पंचशीलनगर, एनडी पटेल रोड) यांनी सोनुबाईचा पहिला पती

संतोष रमेश जाधव याच्यापासून झालेला मुलगा नकुल (६) व नंदिनी (१०) या दोघांना जिवे ठार मारण्याचे हेतूने धुण्याच्या धोपटणीने व हाताचे चापटीने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात मुलगा नकुलचा मृत्यू झाला. तर मुलगी नंदिनी गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे सोनुबाईच्या शेजारी राहणार एस्तेर सतीश दलाल (२५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्यासाठी आरोपींविरोधात जिल्हा न्यायालय दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर याप्रकरणात बुधवारी (दि.२४) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ओे.एस. वाघवसे, यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार साहील उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जगप्रसाद चतुर्वेदी याला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेप व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भारल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास त्याचप्रमाणे गंभीर दुखापत करण्याच्या प्रकरणात तीन वर्ष सश्रम कारावास व ५०० रु. दंडाची शिक्षा सुनावली असून दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. वाय.डी. कापसे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Life imprisonment for the murderer of his beloved son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.