पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:13+5:302021-03-07T04:14:13+5:30
म्हसोबानगरमध्ये राहणाऱ्या भोये दाम्पत्य यांचा दुसरा विवाह होता. मयत कांताबाई यांना पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला कन्यारत्न प्राप्त झाल्याने २४ ...
म्हसोबानगरमध्ये राहणाऱ्या भोये दाम्पत्य यांचा दुसरा विवाह होता. मयत कांताबाई यांना पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला कन्यारत्न प्राप्त झाल्याने २४ जानेवारी २०१६ साली कांताबाई या त्या कन्येला बघण्यासाठी गंजमाळ येथे त्या मुलाच्या घरी गेल्या होत्या. तेथून म्हसोबानगर येथे परतल्यानंतर आरोपी जयराम याने ‘तुझ्या मुलांचे लग्न झाले आहे, आता तु त्यांच्याकडे जावयाचे नाही,’ असे सांगत आरडाओरड करुन शिवीगाळ करत ‘तू मला न विचारता त्यांच्याकडे का गेली’ असा जाब विचारून हाताच्या चापटीने मारहाण केली होती. तसेच मयत कांताबाई यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. भाजलेल्या अवस्थेत कांताबाई यांना जिल्हा व शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथील जळीत कक्षात कांताबाई यांनी पोलीस उपनिरीक्षक बी.एम.देशमुख यांना मृत्युपुर्व जबाब दिला होता. यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढेही जबाब नोंदवून पती जयरामविरुध्द तक्रार दिली होती. उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने जयरामविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नीला जीवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी.श्रीमनवार, पालकर यांनी करत जयरामविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
--इन्फो--
मृत्यूपुर्व दिलेला जबाब सबळ पुरावा
यावर सुनावणी सुरु होती. अंतीम सुनावणी शनिवारी देसाई यांच्या न्यायालयात झाली. यावेळी सरकारी पक्षाकडून अभियोक्ता ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली. न्यायालयात एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात मयत कांताबाई यांनी मृत्युपुर्व दिलेला जबाब हा न्यायालयाने ग्राह्य धरला. जयरामविरुध्द हा सबळ पुरावा ठरला. या पुराव्याच्यअधारे न्यायालयाने जयराम यास पत्नी कांताबाईच्या खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरले.