पंचवटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या खुनातील दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:02 AM2018-12-23T00:02:11+5:302018-12-23T00:02:25+5:30

हॉटेल व्यावसायिकास रामवाडी पुलाजवळ अडवून लूट केल्यानंतर निर्र्घृण खून करणाऱ्या विक्की ऊर्फ वैभव दत्तात्रय काळे (२१, रा़ तळेनगर, रामवाडी, पंचवटी) व बॅटºया ऊर्फ कृष्णा सदानंद चांदवडकर (१९, रा़ फ्लॅट नंबर १६, शिवदर्शन अपार्टमेंट, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) या दोघांन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शनिवारी (दि़२२) जन्मठेप व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ अरूण बर्वे (स्नेहपार्क सोसायटी, बच्छाव हॉस्पिटलमागे, पंचवटी) या हॉटेल व्यावसायिकाचा आरोपींनी लूट करून खून केल्याची घटना घडली होती़

 Life imprisonment for two brothers of Panchavati hotel owner | पंचवटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या खुनातील दोघांना जन्मठेप

पंचवटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या खुनातील दोघांना जन्मठेप

Next

नाशिक : हॉटेल व्यावसायिकास रामवाडी पुलाजवळ अडवून लूट केल्यानंतर निर्र्घृण खून करणाऱ्या विक्की ऊर्फ वैभव दत्तात्रय काळे (२१, रा़ तळेनगर, रामवाडी, पंचवटी) व बॅटºया ऊर्फ कृष्णा सदानंद चांदवडकर (१९, रा़ फ्लॅट नंबर १६, शिवदर्शन अपार्टमेंट, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) या दोघांन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शनिवारी (दि़२२) जन्मठेप व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ अरूण बर्वे (स्नेहपार्क सोसायटी, बच्छाव हॉस्पिटलमागे, पंचवटी) या हॉटेल व्यावसायिकाचा आरोपींनी लूट करून खून केल्याची घटना घडली होती़  ३१ मे २०१७ रोजी हॉटेलचे कामकाज आटोपून अरुण बर्वे हे रात्रीच्या सुमारास आपल्या मेस्ट्रो दुचाकीने घरी परतत होते़ आरोपी काळे व चांदवडकर यांनी रामवाडी पुलाजवळ बर्वे यांची दुचाकी अडवून त्यांच्या हातातील चांदीच्या अंगठ्या, गळ्यातील चांदीची चेन, कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेत दगडाने डोक्यावर मारहाण तसेच कोयत्याने पाठीवर वार करून खून केला़ यानंतर त्याचे प्रेत गोदावरी नदीत फेकून देऊन मेस्ट्रो दुचाकी घेऊन गेले होते़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़
पंचवटी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंढे या घटनेचा तपास करीत असताना एका खबºयाकडून आरोपींकडे नवीन मेस्ट्रो दुचाकी असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार या काळे व चांदवडकर यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीच्या कालावधीत सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत, गुन्ह्यात वापरलेले हत्यार कोयता, चोरलेले दागिने व मेस्ट्रो दुचाकी व रक्ताने भरलेले कपडे काढून दिले होते़ या गुन्ह्याचा तपास करून मुंढे यांनी न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील आऱ एल़ निकम यांनी न्यायालयात दहा साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़
शिक्षेसाठी पैरवी अधिकारी एएसआय पी़ व्ही. शिंदे, पोलीस नाईक एस़ एल़ जगताप, पोलीस शिपाई आऱ आऱ जाधव यांनी प्रयत्न केले़
न्यायाधीश गिमेकर यांनी या खून खटल्यात शिक्षा देताना पोलिसांनी गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे, आरोपीकडून मयत बर्वे यांच्या जप्त केलेल्या वस्तू, दुचाकी तसेच साक्षीदारांची साक्ष या बाबी लक्षात घेऊन दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

Web Title:  Life imprisonment for two brothers of Panchavati hotel owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.