वेदांच्या अभ्यासाने जीवन अर्थपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:01 AM2018-09-15T01:01:35+5:302018-09-15T01:01:42+5:30
वेद अपौरु षीय असून, वेद जगासाठी उपयुक्त आहेत. वेदांचा अभ्यास नियमित करावा कारण वेदांच्या अभ्यासानेच आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते, असे प्रतिपादन संस्कृत ज्ञानवंत प्रभाकर भातखंडे यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत ऋ षिपंचमीनिमित्त ११ गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांना दीपस्तंभ सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याप्रसंगी भातखंडे बोलत होते.
पंचवटी : वेद अपौरु षीय असून, वेद जगासाठी उपयुक्त आहेत. वेदांचा अभ्यास नियमित करावा कारण वेदांच्या अभ्यासानेच आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते, असे प्रतिपादन संस्कृत ज्ञानवंत प्रभाकर भातखंडे यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत ऋ षिपंचमीनिमित्त ११ गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांना दीपस्तंभ सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याप्रसंगी भातखंडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सतीश शुक्ल होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिरीष देशपांडे होते. यावेळी बोलताना भातखंडे पुढे म्हणाले की, आरोग्यासारखे दुसरे कोणतेही धन नाही. निरामय जीवन जगण्यासाठी मानसिक आरोग्याचे संतुलन टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य विलास औरंगाबादकर, डॉ. विनय ठकार हरिश्चंद्र देशमुख, डॉ. विकास गोगटे, सी. डी. कुलकर्णी, हेमाताई पाठक, प्रा. सतीश कुलकर्णी, आत्माराम कुलकर्णी, पुरुषोत्तम कुलकर्णी, कविवर्य उपेंद्र पाराशरे, सुधाकर गर्गे आदींना सन्मानपत्र तसेच पुणेरी पगडी परिधान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य तसेच राधा अंधृटकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्र माला भानुदास शौचे, तुषार जोशी, अनिल देशपांडे, धनंजय पुजारी, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, अनिल देशपांडे, दीपक गायधनी आदी उपस्थित होते.