पाईपात अडकलेल्या घुबडांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 02:35 PM2020-04-05T14:35:07+5:302020-04-05T14:35:43+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले व त्यांना त्याच्या अधिवासात मुक्त सोडण्यात आले .
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले व त्यांना त्याच्या अधिवासात मुक्त सोडण्यात आले . याकामी कळवण वनविभागाचे मोकभणगी बिटाचे वनपरीशेत्र अधिकारी शशी वाघ व त्यांचे सहकारी युवराज गावित यांनी रेश्क्यू आॅपरेशन केले.
सागर वाघ हा तरु ण त्याच्या कांदा चाळीत कांदा साठवणूकीची पूर्व तयारीसाठी चाळ व शेड ची साफसफाई करत असताना त्याला चाळीत वरती अडकवलेल्या पायपात आवाज येऊ लागला. त्यावेळेस त्याने ट्रकटरवर उभे राहून पाईपात मोबाईलचा प्रकाश लाऊन पाहिला असता त्याला त्या पायपात घुबड असल्याचे लक्षात आले .त्यानंतर त्यांने कळवण वनविभागाला घुबड पायपात अडकून राहिली असल्याची माहिती दिली. कळवण वनविभागाचे मोकभणगी बिटाचे वनपरीशेत्र अधिकारी शशी वाघ व त्याचे सहकारी काही वेळात पिळकोसला पोहचले .त्यावेळेस त्यांनी पाहणी केली असता अडचनीच्या ठिकाणी घुबड अडकल्याचे लक्षात आले . त्यांनी तो पाईप शेतकरी अमोल वाघ ,राहुल सूर्यवंशी ,संभाजी वाघ ,रवींद्र वाघ, शरद मोरे ,दुर्गेश सूर्यवंशी ,यांच्या मदतीने खाली काढून घेतला व पाईपचा मध्यभागाची कपलिंग काढून पाईपाचे दोन भाग करत घुबडाची सुटका केली. त्यावेळेस त्या पायपातून नर व मादी अशी दोन घुबड निघाली व एक पिल्ल मिळून आले .त्यांना पायपातून सुखरूप काढून कळवण वनविभागाच्या नाकोडा येथील रोपवाटिकेत त्याच्या अधिवासात सोडण्यात आले .