‘जीवन का राज ऋतुओं के साज पर...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:45 AM2019-07-22T00:45:40+5:302019-07-22T00:46:00+5:30
मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला.
नाशिक : मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला.
अखिल हिंदी साहित्य सभेच्या वतीने एक शाम ‘अहिसास’ के नाम या कार्यक्रमांतर्गत या लघुनाटिकेचे शनिवारी (दि.२०) आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. विद्या चिटको प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पी अवस्थी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुभोध मिश्र, दिग्दर्शक सुधा
झालानी, माधुरी गोडबोले, मैथिली गोखले, मंजू चिमोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, गोडबोले लिखित ‘हिंदी-मराठी महिला निबंधकार’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित हिंदी, उर्दू भाषिक कवींनी आपल्या रचना सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
उत्तरोत्तर रंगलेल्या काव्य मैफलीत विविध कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सभेच्या महिला कलावंतांनी ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर...’ या लघुनाटिकेतून पारंपरिक वेशभूषेत निवडलेल्या ऋतू आणि त्यामध्ये मानवी जीवनशैलीत होणाऱ्या बदलाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ऋतूला अनुसरून महिलांनी पोशाख व श्रृंगार केलेला होता. यामध्ये अनिता दुबे (वसंत), श्रद्धा शिंदे (ग्रीष्म), पुर्णिमा ढिल्लंन (वर्षा), रईसा खुमार (शरद), नेहा अवस्थी (हेमंत), सुनीता माहेश्वरी (शिशिर) यांनी आपल्या भूमिका साकारल्या. संगीत प्रदीपकुमार दुबे यांनी दिले. सूत्रसंचालन डॉ. दीपा कुचेकर यांनी केले.