मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर जीवघेणी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:37 AM2018-03-22T00:37:02+5:302018-03-22T00:37:02+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून, रोज लहान-मोठे अपघात घडतात. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर केला. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दीड वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात भूमिपूजन करण्यात आले पण अजूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही. त्यामुळे प्रशासन अजून किती बळी घेण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. या मार्गावर चारही बाजूने प्रचंड वेगाने वाहतूक सुरू असते. बघताक्षणी वाहने अंगावर येतात. त्यामुळे रस्ता क्र ॉस करताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ उडते. या गोंधळात बºयाचदा अपघात घडतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. वाहतूक पोलीसदेखील कायमस्वरूपी दिसत नाही. अशी तक्रार नागरिक करत आहे. सन २०१३ पासून आजपर्यंत ४०५ अपघात आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेले आहेत. त्यामध्ये १६३ लोकांचा मृत्यू झाला असून २९४ लोक जखमी झाले आहेत. यातील ८० टक्के अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर झालेले आहेत.
मुंबई-आग्रा रोडवरील चौफुलींवर वाहतूक कोंडी व अपघात ही समस्या गंभीर झाली असून, उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पण दीड वर्ष उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नाही. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करावे.
- संदीप जाधव, नागरिक