दुचाकीवर असताना मोबाइलवर बोलण्याची जीवघेणी घाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:53+5:302020-12-29T04:12:53+5:30

नाशिक : दुचाकीवर असताना मोबाइलवर न बोलता दुचाकी बाजूला घेऊन मगच मोबाइलवर बोलावे असा वाहतुकीचा नियम असतानाही या नियमांचे ...

Life threatening hurry to talk on mobile while on a bike ... | दुचाकीवर असताना मोबाइलवर बोलण्याची जीवघेणी घाई...

दुचाकीवर असताना मोबाइलवर बोलण्याची जीवघेणी घाई...

Next

नाशिक : दुचाकीवर असताना मोबाइलवर न बोलता दुचाकी बाजूला घेऊन मगच मोबाइलवर बोलावे असा वाहतुकीचा नियम असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. भर रस्त्यात दुचाकी सुरू असताना मोबाइलवर बोलण्याची घाई अपघाताला निमंत्रण देणारी असतानाही हा धोका दुर्लक्षित केला जात आहे. रस्ते अपघातामध्ये मोबाइलवर बोलत असताना झालेल्या अपघाताची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते.

संपर्क साधनांमध्ये मोबाइलचे महत्त्व वाढले असले तरी मोबाइल किती, कुठे आणि कधी वापरावा याचे बटण आपल्याच हाती आहे. त्यामुळे मोबाइल नियंत्रिण असणे अपेक्षित असतानाही अनेक दुचाकीस्वार मोबाइलवर बोलत असल्याने स्वत:च्यासह इतरांच्याही अपघाताला निमंत्रण देत असतात. अनेक तरुणांच्या कानाला ब्लू टुथ कनेक्टेड हेडफोन्स असतात त्याचा दुचाकीवर असताना नक्कीच लाभही होतो. परंतु असे असले तरी मोबाइलवरील मेसेज ट्युन वाजली तरी दुचाकीवरील लोक खिशातून मोबाइल काढून पाहत असतात. या नादातही अनेकदा अपघात घडू शकतात.

काही तरुण हे दोन्ही हात दुचाकीच्या हॅन्डलवर ठेवून खांद्याचा आधार घेत मोबाइलवर बोलत असतात, तर काही तरुण दुचाकी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने कानाला मोबाइल लावून बोलत असतात. अनेकदा तर दुचाकीवर असताना मोबाइलवर होणाऱ्या वादाच्या संवादातूनदेखील अपघात घडण्याचे प्रकार घडून जातात. काही तरुण तर कानाजवळ हेल्मेटमध्ये मोबाइल घुसवून बेालण्याची करामतही करतात. हा सारा प्रकार दुचाकीचालकाच्या जिवावर बेतणारा ठरू शकतो.

मोबाइल वापरण्याबाबतची काळजी घेताना शक्यतो दुचाकीवर असताना मोबाइल न घेता नंतर संपर्क साधता येऊ शकतो. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करूनही मोबाइलवरील संवाद पूर्ण करता येणे शक्य आहे. मात्र या साध्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते.

Web Title: Life threatening hurry to talk on mobile while on a bike ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.