निळवंडीपाडे नदीवरील पुलावरुन जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:08 PM2020-10-11T22:08:33+5:302020-10-12T01:13:59+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील निळवंडीपाडे येथील कोलवण नदीवरील पुल सध्या अर्धवट कामामुळे प्रवास वर्गाची डोकेदुखी बनला आहे. या पुलाचे काम जवळ जवळ पाच ते सहा वर्षापासून अतिशय धिम्या गतीने चालू असल्यामुळे प्रवासी वर्गाला येथून प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील निळवंडीपाडे येथील कोलवण नदीवरील पुल सध्या अर्धवट कामामुळे प्रवास वर्गाची डोकेदुखी बनला आहे. या पुलाचे काम जवळ जवळ पाच ते सहा वर्षापासून अतिशय धिम्या गतीने चालू असल्यामुळे प्रवासी वर्गाला येथून प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
दिंडोरी तालुक्याच्या गावाला जोडणारा निळवंडीपाडे ते दिंडोरी हा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेतून मार्गक्र मण करीत असल्यामुळे प्रवासी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. या रस्त्याने दिंडोरी तालुक्याच्या बरीच गावांचा संपर्क येत असल्यामुळे या रस्त्याने नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. परंतु सध्या या रस्त्याला खड्ड्याचे ग्रहण लागल्याने प्रवास कसा करावा. ही मोठी चिंतेची बाब होऊन बसली आहे. या रस्त्याने थेट ननाशी, हातनोरे, पाडे,पिंपळगाव धुम,नळवाड पाडा,म्हेळुसके, करजंवण, ओझे, कादवा म्हाळुंगी, शिवारपाडा आदी गावांचा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी नेहमी प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्याने प्रवास करतांना अनेक वेळा छोटे मोठे अपघात झालेले आहे. काही कायम स्वरूपी कंबरचे आजार जडले आहे. नवीन गाडी सहा मिहन्यात जुनी होऊन बसली आहे. अनेक रग्णांना तसेच वेगवेगळ्या आजाराचे रग्ण, गरोदर महिला यांना या रस्त्याने प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्या सारखेच वाटते.
काम केव्हा पुर्ण होईल?
निळवंडीपाडे येथील नदीवरील पुल वर्षानुवर्ष धिम्या काम गतीमुळे नेहमी चर्चेत येत आहे.या कामाचे ठेकेदार नेहमी बदलत असल्यामुळे काम लांबणीवर पडले असल्याची चर्चा आहे. पावसाळी हंगामात प्रवासी, शेती मालाची वाहतूक करणारे वाहने यांना येथून प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तेव्हा या पुलाचे काम केव्हा पुर्ण होईल व केव्हा सुखाने प्रवास करता येईल. अशी मागणी सध्या जोर धरीत आहे. या रस्त्याचे व पुलाचे काम लवकर जर पुर्ण नाही झाले तर सर्व प्रवासी वर्गाने आंदोलनाचा इशारा दिला.