विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 10:43 PM2019-08-08T22:43:25+5:302019-08-08T22:44:07+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बाणंगगा नदीच्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मिटवाडीसाठी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बाणंगगा नदीच्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मिटवाडीसाठी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील अंदाजे १५० ते २०० लोकसंख्या असलेल्या वस्तीतील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी तीन ते चार महिने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच अंगणवाडीतील मुलांना तर जोपर्यंत बंधाºयाच्या सांडव्यातील पाणी बंद होत नाही तोपर्यंत अंगणवाडीतील मुलांना शिक्षणापासून वंचितच राहावे लागत आहे. मिटवाडी वस्तीसाठी पर्यायी मार्ग आहे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. तेथून मिटवाडी वस्तीत जावे लागते.
त्यामुळे मिटवाडी वस्तीसाठी दखल घेऊन या नागरिकांची व विद्यार्थ्यांची दखल घेऊन मिटवाडी वस्तीसाठी पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे. आमच्या मिटवाडी भागातील नागरिकांना गावात येण्या-जाण्यासाठी दररोज सकाळ - संध्याकाळ बाणगंगा नदीच्या बंधाºयावरून ये-जा करावी लागते; परंतु पावसाळ्यात चार महिने या नदीला खूप पाणी राहात असल्याने या वस्तीतील नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत घातक बनला असून, शालेय विद्यार्थ्यांना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे शासनाने आमच्या या वस्तीला रस्त्यावर जोडणारा पूल त्वरित बांधून आमची गैरसोय थांबवावी.
- सुभाष नेहरे, ग्रामपंचायत सदस्य, जानोरी