अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:43 PM2017-12-25T23:43:56+5:302017-12-26T00:20:37+5:30
येथील जुन्या आखाड्यानजीक मंदिरात अन्नपूर्णामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लक्षचंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वतयारीच्या नियोजनासाठी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर : येथील जुन्या आखाड्यानजीक मंदिरात अन्नपूर्णामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लक्षचंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वतयारीच्या नियोजनासाठी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत लक्षचंडी यज्ञ सोहळ्याच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विविध समित्या करण्यात येऊन जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. २००० मध्ये सहस्त्रचंडी महायज्ञाने भूमिपूजन करून मंदिरनिर्मितीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ फेब्रुवारीपासून ११ दिवस लक्ष चंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नांदीश्रद्धा , सोळा संस्कार, होम-हवन आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. लक्षचंडी यज्ञासाठी १०० यज्ञ कुंडं तयार करण्यात येणार असून, ६५० ब्राह्मणांच्या व १०० यजमानांच्या सहभागाने पाठात्मक हवन केले जाणार आहे. महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांनी १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अन्नपूर्णामातेचे मंदिर असावे असा संकल्प केला होता. त्या संकल्पाची फेबु्रवारी महिन्यात पूर्ती होत आहे. याप्रसंगी महंत दिव्यानंद, महंत विवेकानंद, श्यामकुमार सिंगल, सुरेश रावत, विलास ठाकूर, किशोर गोयल, शेखर सावंत, दिलीप काळे, सतीश दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनोखे मंदिर, भिंतींवर पौराणिक देखावे
मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरनंतर त्र्यंबकेश्वर येथे तयार झालेले हे मंदिर म्हणजे बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. राजस्थानहून मागविलेल्या संगमरवरी पाषाणातून हे मंदिर तयार करण्यात आले आहे. मंदिरात स्थापन करण्यात येणारी अन्नपूर्णामातेची मूर्ती १९३१ किलो वजनाची आहे. ही मूर्ती पंचधातूपासून बनवली आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक देखावे चितारलेले आहेत.