गोंदे येथे दोन जंगली प्राण्यांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:29+5:302021-02-05T05:35:29+5:30
गोंदे येथील संजय काशिनाथ दातीर या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये खोकडे नामक दोन जंगली प्राणी पाणी पिण्याच्या शोधात पडले होते. ग्रामपंचायत ...
गोंदे येथील संजय काशिनाथ दातीर या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये खोकडे नामक दोन जंगली प्राणी पाणी पिण्याच्या शोधात पडले होते. ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सोनवणे यांनी घटनेची माहिती वनपाल अनिल साळवे, बी.व्ही. तुपलोंढे, पंढरीनाथ तांबे, खंडू आव्हाड यांना भ्रमणध्वनीवरून दिली. सुमारे पंचवीस ते तीस फूट विहीर खोल असल्याने, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हिरव्या नेटचा वापर करून अर्ध्या तासात दोन्ही खोकडांना बाहेर काढले. सदरचा जंगली प्राणी आपल्या भागात तुरळक प्रमाणात आढळत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. यावेळी माजी उपसरपंच भागवत तांबे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सोनवणे, बाळासाहेब तांबे, विजय तांबे, बबन दातीर, नवनाथ जायभावे, मोहन तांबे, राहुल तांबे, योगेश तांबे आदींसह शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना मदत केली.
फोटो- ०३ गोंदे
विहिरीत अडकलेला खोकडे नामक जंगली प्राणी.
===Photopath===
030221\03nsk_22_03022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ गोंदेविहिरीत अडकलेले खोकडे नामक जंगली प्राणी.