चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:12 AM2019-01-24T01:12:01+5:302019-01-24T01:12:14+5:30

महाराष्ट राज्य कलाप्रदर्शन विद्यार्थी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित ५९वा विद्यार्थी राज्य कलाप्रदर्शन आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 Lifetime Achievement Award for painter Anand Sonar | चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्कार

चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्कार

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट राज्य कलाप्रदर्शन विद्यार्थी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित ५९वा विद्यार्थी राज्य कलाप्रदर्शन आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कालिदास कलामंदिर येथे आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर कलाप्रदर्शन विभागाचे राजीव मिश्रा, उपसंचालक डांगे, भास्कर तिखे, शासकीय चित्रकला महाविद्यालयांचे डीन रमेश वडजे, विश्वनाथ साबळे, मानकर उपस्थित होते. नाशिकच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल अभंगे, परीक्षा नियंत्रक वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांना शासनाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच राज्यभरातील कलाकारांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला. व्यावसायिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलाकार’ विभाग आणि महाराष्टतील कला महाविद्यालयांमध्ये कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्या निवडक कलांचे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील कोणत्याही एका जिल्ह्णात भरविले जाते.  ते यंदा नाशिकमध्ये भरविण्यात आले असून महात्मा फुले कलादालन येथे हे प्रदर्शन सुरू झाले आहे. यामध्ये सुमारे ९५० कलाकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे.

Web Title:  Lifetime Achievement Award for painter Anand Sonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.