दिंडोरी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:02+5:302020-12-12T04:31:02+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी चिंतीत पडला आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी चिंतीत पडला आहे.
अगोदर द्राक्षे हंगामासाठी पोषक वातावरण उत्तम होते; परंतु दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत असून, सकाळपासून हलक्या स्वरूपाच्या पावसांच्या सरी पडल्यामुळे द्राक्षे पंढरी हादरली आहे. या वातावरणाचा द्राक्षे पिकांवर लवकर परिणाम होत असल्याने बळीराजाला द्राक्षबागा वाचवण्यासाठी पावडर फवारणीची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सामोरे जाण्याची चित्र निर्माण झाले आहे. सध्या जवळ-जवळ ६० ते ७० टक्के द्राक्षे बागा साखर प्रमाणात आहे. काही बागा मध्यम स्थितीमध्ये आहे. म्हणजे तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच बागा या पूर्ण अवस्थेत असल्याने त्या वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची महागड्या किमतीच्या पावडरी खरेदीवर भर दिली आहे. अगोदरच सुरुवातीला प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च करून द्राक्षबागा वाचविल्या. बागा आता जोमात असताना वातावरणातील बदलाने शेतकरी हादरला आहे.
(११ लखमापूर १)
------------------
१) ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांपासून दिंडोरीकरांना सूर्य दर्शन नाही.
२) हलक्या स्वरूपांचा पाऊस पडल्याने द्राक्षे बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अत्यंत महागड्या पावडरी खरेदी करून बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ.
३) बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे.
-------
अचानक वातावरणात झालेला हवामानातील बदल द्राक्षे पिकांसाठी घातक असून, शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.
....संदीप मोगल, द्राक्षे उत्पादक, लखमापूर
===Photopath===
111220\11nsk_8_11122020_13.jpg
===Caption===
(११ लखमापूर १)