गोदामाईच्या प्रवासावर प्रकाशझोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:47 AM2018-12-31T01:47:07+5:302018-12-31T01:47:33+5:30

त्र्यंबकेश्वरपासून उगम पावलेल्या एक हजार ४६५ कि.मी. लांबीच्या गोदावरीच्या प्रवासावर विविध चित्रे, छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. ‘गोदास्पंदन’ चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीनदिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.३०) समारोप करण्यात आला.

Lighting on the journey of godowns | गोदामाईच्या प्रवासावर प्रकाशझोत

गोदामाईच्या प्रवासावर प्रकाशझोत

Next
ठळक मुद्देगोदास्पंदन : चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : त्र्यंबकेश्वरपासून उगम पावलेल्या एक हजार ४६५ कि.मी. लांबीच्या गोदावरीच्या प्रवासावर विविध चित्रे, छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. ‘गोदास्पंदन’ चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीनदिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.३०) समारोप करण्यात आला.
इंदिरा गांधी राष्टÑीय कला केंद्र व संस्कार भारती नाशिकच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कलादालनात आयोजित गोदस्पंदन प्रदर्शनात शहरातील विविध चित्रकारांनी कुंचल्यातून रेखाटलेल्या ‘गोदावरी’ विषयाला अधोरेखित करणाऱ्या चित्राकृती तसेच छायाचित्रकारांनी गोदावरीचे टिपलेली विविधांगी रूपे प्रदर्शित करण्यात आली होती. रामकुंड, गांधीतलाव, अहल्यादेवी होळकर पूल, देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रोकडोबा व्यायामशाळा, दुतोंड्या मारुती, सोमेश्वर धबधबा अशा विविध चित्राकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. तसेच कोरडेठाक पडलेले गोदापात्र तर दुथडी भरून वाहणारी गोदामाई आणि सिंहस्थ कुं भमेळा पर्वणी ते सिनेमांचे चित्रीकरणापर्यंतचे विविध प्रसंग शहरातील छायाचित्रकारांनी खुबीने टिपले होते. त्यांनी टिपलेली ही छायाचित्रेदेखील या प्रदर्शनात प्रदर्शित क रण्यात आली होती. या चित्रप्रदर्शनाला गोदाप्रेमी नाशिककरांनी मोठ्या संख्येने भेद देत गोदामाईची संस्कृती, सौंदर्य आणि सध्याची विदारक अवस्था ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. चित्रप्रदर्शनाचा रविवारी समारोप करण्यात आला.
गोदावरीचा इतिहास अन् संस्कृती
च्गोदावरी नदीच्या उगमापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रवास नकाशावरून दाखविण्यात आला आहे. तसेच गोदावरीला डाव्या-उजव्या बाजूने येऊन मिळणाºया नद्या, गोदावरी खोºयातील वन्यजीव अभयारण्य, गोदावरीची लांबी, समृध्द झालेले खोरे, लोकसंख्या, धरणे, हायड्रो पॉवर प्रकल्प, औष्णिक विद्युत केंद्र तसेच गोदाकाठावर दर बारा वर्षांनी त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा आदी महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या गोदावरी नदी व तिचे खोरे आणि संस्कृतीची सविस्तर माहितीवरून प्रदर्शनाला भेट देणाºया अनेकांनी आपले सामान्यज्ञान वृध्दिंगत केले.

Web Title: Lighting on the journey of godowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.