वीज पडून महिला ठार एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:31 PM2019-10-05T21:31:02+5:302019-10-05T21:31:55+5:30
दिंडोरी : परतीच्या पावसाने दिंडोरी येथील श्रीरामनगर येथील यमुनाबाई गांगुर्डे ही महिला अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. गांडोळे येथील सुनीता भोये ही महिला गंभीर जखमी झाली, तर राशेगाव येथे वीज पडल्याने बैल ठार झाला आहे,
दिंडोरी : परतीच्या पावसाने दिंडोरी येथील श्रीरामनगर येथील यमुनाबाई गांगुर्डे ही महिला अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. गांडोळे येथील सुनीता भोये ही महिला गंभीर जखमी झाली, तर राशेगाव येथे वीज पडल्याने बैल ठार झाला आहे,
परतीच्या पावसाने दिंडोरी सह तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह हजेरी लावली गुरु वार व शुक्र वारी दोन दिवसांच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिंडोरी श्रीराम नगर येथील यमुनाबाई निवृत्ती गांगुर्डे (५५) यांच्यावर रस्त्याच्याकडेला शेळ्या चारत असताना वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान गांडोळे येथील सुनीता नंदाराम भोये (४५) ही महिला शेतात काम करत असताना वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. तीला नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर राशेगाव येथे शेतकरी शिवाजी भीमा इचाळ यांच्या बैलावर वीज पडल्याने त्याचा मृत्यु झाला.
दिंडोरी तालुक्यात शुक्र वारी चार वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली, दिंडोरी शहरात काही भागात गाराही पडल्या. अवनखेड, परमोरी, लखमापुर फाटा, वनारवाडी, मोहाडी, आक्र ाळे, पालखेड परिसरात मुसळधार पाऊस झाला तर ओझरखेड कादवा कारखाना, निळवंडी, पाडे, उमराळे, ढकांबे आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.
तळेगाव दिंडोरी परिसरात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने तळेगाव जवळील नाल्याला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी रस्त्यावर आले त्यामुळे वाहतूक एक तास ठप्प झाली होती. परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खतवड परिसरात टोमॅटो, कारले, भोपळे पिकाचे मोठे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडले तसेच काही घरे व शेडचे पत्रे उडून गेले.
गडावर पायी चालणाºया भाविकांचे हाल
नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक पायी जातात
शुक्र वारी चार वाजता झालेल्या पावसामुळे भाविकांचे मोठे हाल झाले तसेच शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने भाविकांचे हाल झाले. अनेकांना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला.