विजांचा कडकडाट अन‌् ढगांच्या गडगडाटासह शहरात सर्वत्र धुवाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 03:24 PM2020-10-18T15:24:36+5:302020-10-18T15:25:22+5:30

पुढील ४८ तासांत गुजरातसह संपुर्ण महराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

Lightning strikes and thunderstorms throughout the city | विजांचा कडकडाट अन‌् ढगांच्या गडगडाटासह शहरात सर्वत्र धुवाधार पाऊस

विजांचा कडकडाट अन‌् ढगांच्या गडगडाटासह शहरात सर्वत्र धुवाधार पाऊस

Next
ठळक मुद्देपंचवटीत मुसळधार; रस्ते जलमय

नाशिक : शहर व परिसरात दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात तीन वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागात पावसाचा जोर अधिक राहिल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सर्वच मोकळ्या भुखंडांना तलावाचे स्वरुप प्रा्प्त झाले होते. रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले होते.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हळुहळु अरबी समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील ४८ तासांत ओमानच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे गुजरातसह संपुर्ण महराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. चार दिवसांपुर्वीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत आज रविवारी जोरदार पाऊस झाला.

पंचवटी : रविवारी दुपारच्या सुमाराला अचानकपणे परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने पंचवटीतील बहुतांशी रस्ते जलमय झाले होते.साधारणपणे अर्धा तास विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते काही काळ ओस पडले होते रविवारचा दिवस असल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची दुपारी आलेल्या पावसामुळे चांगली तारांबळ उडाली.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस दमदारपणे हजेरीलावेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार चार ते पाच दिवसांपूर्वी शहरात पावसाचे पुनरागमन झाले होते.
रविवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते तर गल्लीबोळातील रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी वाहन चालकांना भर पाण्यातून तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. उंचसखळ भागात तसेच मोकळ्या भूखंडावर पाणीच पाणी साचले होते. पंचवटीतील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुना आडगाव नाका, गजानन चौक परिसर, दिंडोरी रोड, गणेशवाडी, भाजीमंडई समोरील परिसरासह अन्य भागातील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते तर पावसामुळे नाले ओसंडून वाहू लागल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Lightning strikes and thunderstorms throughout the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.