लिळाचरित्र आद्यग्रंथ हा मराठीचा आरसा- अंजनगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:41 AM2019-05-19T00:41:41+5:302019-05-19T00:41:57+5:30

चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्दप्रयोग हे लिळाचरित्राचे वैशिष्ट्य आहे. बाराव्या शतकातील महाराष्ट्रातील संस्कृती, चालीरीती, जीवनमान याची माहिती घेण्यासाठी महानुभाव पंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.

The Lilacharitra Adhunagrha is Marathi's Mirror - Anjangaonkar | लिळाचरित्र आद्यग्रंथ हा मराठीचा आरसा- अंजनगावकर

लिळाचरित्र आद्यग्रंथ हा मराठीचा आरसा- अंजनगावकर

Next

नाशिकरोड : चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्दप्रयोग हे लिळाचरित्राचे वैशिष्ट्य आहे. बाराव्या शतकातील महाराष्ट्रातील संस्कृती, चालीरीती, जीवनमान याची माहिती घेण्यासाठी महानुभाव पंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.
योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दत्तमंदिररोडवरील लायन्स क्लबच्या सभागृहात व्याख्यानमाला सुरू आहे. त्यावेळी अंजनगावकर यांनी महानुभाव पंथाच्या अंतरंगात यावर दुसरे पुष्प गुंफले.अंजनगावकर म्हणाले की, ज्याचा आत्मा कष्ट, अपमान सहन करतो, तरीही त्याचे मन शांत असते, विचार उच्च असतात त्यालाच महात्मा म्हणतात. राजकुमार असूनही सर्व सुखाचा त्याग करणारे चक्र धर स्वामी हे महात्मा होते. महात्म्यांच्या दृष्टी व वाणीत विशेष ताकद असते. त्यांनी महानुभव पंथात सर्व जातींच्या व्यक्ती तसेच विधवांनाही प्रवेश दिला. महानुभव पंथ स्वीकारताना त्या व्यक्तीला त्याच्या धर्माचे आचारण करण्याची परवानगी दिली. असे करून त्यांनी हिंदू धर्मालाही जपले. महानुभव व वारकरी पंथाने महाराष्ट्राला समता, ममता, अहिंसा शिकवली. त्यामुळे लोक व्यसनांपासून दूर राहिले. जो समाजाच्या उपयोगी पडतो तोच धर्म किंवा संप्रदाय महत्वाचा असतो. महानुभाव पंथांचे संस्थापक च्रकधर स्वामींनी मराठीत धर्मोपदेश करून
क्रांती केली. मराठीला त्यांनी धर्मभाषेचा दर्जा दिला. त्यांनी वर्णवर्चस्व, स्त्री-
पुरुष भेदभाव, विषमता संपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अध्यक्ष रमेश जाधव, दिनकर मोडक, प्रकाश गुरव, के. डी. पाळदे, अशोक व्यवहारे, शांताराम व्यवहारे, त्र्यंबक खंदारे, संजय गोसावी, सुरेश वडगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: The Lilacharitra Adhunagrha is Marathi's Mirror - Anjangaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.