विद्यार्थ्यांना लिंबू पावडरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:07 AM2018-05-10T01:07:15+5:302018-05-10T01:07:15+5:30

लोहोणेर : रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर्स यांच्या वतीने महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) आयोजित ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ या उपक्रमाअंतर्गत परिसरातील विद्यार्थ्यांना लिंबू पावडरचे वाटप करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. या उन्हाची तीव्रता अधिक भासत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी विशिष्ट उर्जेची गरज असते.

Lime powder allocated to students | विद्यार्थ्यांना लिंबू पावडरचे वाटप

विद्यार्थ्यांना लिंबू पावडरचे वाटप

Next
ठळक मुद्दे उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी विशिष्ट उर्जेची गरज आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन

लोहोणेर : रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर्स यांच्या वतीने महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) आयोजित ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ या उपक्रमाअंतर्गत परिसरातील विद्यार्थ्यांना लिंबू पावडरचे वाटप करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. या उन्हाची तीव्रता अधिक भासत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी विशिष्ट उर्जेची गरज असते. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते, तरी या विविध शैक्षणिक कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात उष्माघातापासून कसे वाचले पाहिजे, आपण व आपल्या परिवारातील सदस्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे याची माहिती देण्यात आली व या संदर्भात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने लिंबू सरबत पावडरचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख, मनोज देशमुख, सतीश निकम, दिनेश सोनार यांच्या वतीने पॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी आदित्य शेवाळे, शुभम व्यवहारे, चंद्रकांत पवार उपस्थित होते.

Web Title: Lime powder allocated to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.