वाराणसीच्या धर्तीवर नाशिकलाही ‘गंगाआरती’

By admin | Published: August 27, 2016 10:47 PM2016-08-27T22:47:00+5:302016-08-27T22:47:15+5:30

जयकुमार रावल : गंगाआरतीसाठी २० लाखांची तरतूद; बोटक्लब, नाशिक फेस्टिवलही होणार सुरू

On the lines of Varanasi 'Gangaram' | वाराणसीच्या धर्तीवर नाशिकलाही ‘गंगाआरती’

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकलाही ‘गंगाआरती’

Next

नाशिक : नाशिक हे धार्मिक पर्यटनस्थळ, ऐतिहासिक गड किल्ल्यांसह विविध धरणांचे क्षेत्र तसेच नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व वायनरीमुळे खऱ्या अर्थाने पर्यटनस्थळ होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न केले जातील. त्याचाच एक भाग म्हणून वाराणसीच्या धर्तीवर नाशिकला गंगाआरती सुरू करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती ्नराज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२७) शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, वनखाते, पाटबंधारे खाते यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची एक तातडीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांतील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील पर्यटनस्थळ विकसित करण्याबाबत सूचना मांडल्या. त्यातील काही सूचनांवर जयकुमार रावल यांनी तत्काळ निर्णय घेतले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सप्तशृंग गडावरील रोप-वे ट्रॉली सुरू करण्याबरोबरच हतगड येथे पर्यटनस्थळ विकसित करून तेथेही रोप-वे सुरू करण्याची मागणी केली. खासदार हेमंत गोडसे यांनी अंजनेरी, त्र्यंबकेश्वर तसेच बोटक्लबबाबत सूचना मांडली. आमदार सीमा हिरे यांनी नवश्या गणपती, सोमेश्वर ही तीर्थस्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी तेथे बोटिंगची सुविधा व अन्य विकासकामे करण्याची मागणी केली. आमदार दीपिका चव्हाण यांनी मांगीतुंगीसह साल्हेर व मुल्हेर ही स्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. आमदार अनिल कदम यांनी नांदुरमधमेश्वर अभयारण्य पाहण्यासाठी विदेशातून पक्षिप्रेमी येतात. तेथे जाण्यासाठी रस्त्यांची निर्मिती करावी.

Web Title: On the lines of Varanasi 'Gangaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.