वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:26 AM2018-10-21T01:26:40+5:302018-10-21T01:27:04+5:30
भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नाशिक : भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नाशिक टपाल विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकीट संग्रहाच्या प्रदर्शनानिमित्त मधाळ या शहरात आल्या आहेत. शनिवारी (दि.२०) महात्मा फुले कलादालनात प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, देशात अशी कुठलीही जागा शिल्लक नाही, जेथे टपाल खाते पोहोचलेले नाही, त्यामुळे टपालाच्या संपर्क जाळ्याचा वापर केंद्रीय ऊर्जा विभागाकडून केला जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात वीज पोहोचावी आणि जनतेच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्या, या उद्देशाने ऊर्जा विभागाला टपाल विभाग महत्त्वाचे सहकार्य करणार आहे. त्यादृष्टीने पोस्टमन ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचा उपक्रम राबविणार आहे. हा उपक्रम पुढील वर्षअखेर पूर्णत्वास येणार असल्याचे मधाळ यांनी सांगितले. राष्टÑ उभारणीच्या कार्यात टपाल विभाग नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.
वीज सर्वेक्षण मोहिमेसाठी टपाल विभागाची करण्यात आलेली निवड ही सुवर्ण संधी समजून प्रत्येक पोस्टमन त्यासाठी योगदान देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
टपाल खात्याकडूनही ‘डिजिटल’चा स्वीकारकाळानुरूप टपाल विभागाने कात टाकली आहे. संदेशवहनाची विविध माध्यमे आधुनिकतेच्या काळात उदयास आल्यानंतर टपालाचे महत्त्व कमी होईल, असे बोलले जात होते; मात्र या काळात टपाल विभागाचे महत्त्व व जबाबदारी अधिकाधिक वाढली आहे.
च्इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कारभार असो, टपाल विभाग नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘दर्पण’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील टपालाची उप कार्यालये, शाखा कार्यालयदेखील लवकरच डिजिटल होणार असल्याचे शोभा मधाळ यांनी सांगितले.