लायन्स क्लबतर्फे २४०० लाभार्थ्यांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:16+5:302021-05-27T04:16:16+5:30
ग्रामीण भागातील स्थिती लक्षात घेऊन इगतपुरीतील टाकेद खुर्द, जोशीवाडी, उंटवाडी, घोरपडेवाडी, परदेशीवाडी या अतिदुर्गम भागातील २५० आदिवासी कुटुंबांना त्यांच्या ...
ग्रामीण भागातील स्थिती लक्षात घेऊन इगतपुरीतील टाकेद खुर्द, जोशीवाडी, उंटवाडी, घोरपडेवाडी, परदेशीवाडी या अतिदुर्गम भागातील २५० आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन धान्य वाटप केले. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शैक्षणिकदृष्ट्या शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे उपस्थित होते. राजपाल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. क्लबच्या अध्यक्षा डॉ. नुपुरा प्रभू, सचिव सारिका कलंत्री आणि खजिनदार अभय पाटील, डॉ. अमित प्रभू, प्रशांत भरबट, निशा भरबट, राम डावरे, नीलिमा डावरे, अभय बाग, संतोष कलंत्री, ऊर्जा पाटील, अश्विनी बाग, अमित पाटील, पल्लवी पाटील, शिल्पा मराठे, ऋग्वेद मराठे, नेहा लढ्ढा, डॉ. अपर्णा मालेगावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.
===Photopath===
260521\26nsk_43_26052021_13.jpg
===Caption===
आदिवासींना धान्य वाटप