लायन्स पंचवटीचा आजी-आजोबा स्नेह व्हॅलेंटाईन मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:36+5:302021-02-16T04:16:36+5:30
नाशिक : व्हॅलेंटाईन दिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब पंचवटीच्या वतीने आजी-आजोबांचा स्नेह मेळावा सातपूरच्या निवेक सभागृहात पार ...
नाशिक : व्हॅलेंटाईन दिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब पंचवटीच्या वतीने आजी-आजोबांचा स्नेह मेळावा सातपूरच्या निवेक सभागृहात पार पडला. ९० हून अधिक आजी-आजोबांचा सक्रिय सहभाग होता.
मेळाव्याचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी ९२ वर्षांचे मोरेश्वर बनसोड व ८६ वर्षांच्या विजया बनसोड यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषदेच्या लीना बनसोड तर मुख्य वक्त्या वृंदा भार्गवे होत्या. यावेळी संयोजक स्मिता यंदे व वैद्य विक्रांत जाधव यांनी मेळाव्याचे प्रयोजन सांगितले. क्लबचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी स्वागत केले. लायन्स पंचवटीतर्फे सुरू असलेल्या फूड बँकविषयी माहिती अरुण अम्रिउत्कर यांनी दिली. लीना बनसोड यांच्या आई-वडिलांशी वैद्य विक्रांत यांनी संवाद साधून त्यांना बोलते केले. आपल्या वयावर तारुण्य नसते तर मनावर असते असे सांगून बनसोड यांनी आई व वडिलांचे ऋण संस्कारांचे महत्त्व विशद केले. वृंदा भार्गवे यांनी आजी-आजोबा यांनी काळासह बदलत आयुष्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा सल्ला दिला. मेळाव्यामध्ये वैद्य विक्रांत व वैद्य नीलिमा जाधव यांनी आरोग्याच्या टिप्स दिल्या. आजी-आजोबांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संचालन वैद्य नीलिमा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदेश यांनी केले .विविध गाणी उदय पाटील तसेच राजेश अक्कर यांनी गायली.खेळांचे संचालन सौ. मनीषा पाटील, मृणाल पाटील व सुजाता कोहोक, लीना चौतालीया यांनी केले.
इन्फो
ओझे रोज उतरवा
यावेळी संवाद साधताना श्रीमती बनसोड यांनी आयएएस झाल्याचा आनंद झाल्याचे सांगितले. मुलीचा अभिमान असून त्यांच्या मुलाखत, फोटो साहित्य जपून ठेवतात असेही त्यांनी नमूद केले. तर लीना बनसोड यांनी आपल्या खांद्यावर सतत अपेक्षांचे ओझे ठेवू नका, रोजच्या रोज ते उतरवायला शिकून आयुष्याची गोडी वाढवत नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.