स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा, बुकींगनंतर आठवडाभराहून अधिक काळ करावी लागते सिलिंडरची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:55 PM2019-03-04T14:55:42+5:302019-03-04T15:00:02+5:30
शहरात गेल्या महिनाभपासून ऐन लग्नसराईच्या काळात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना आठ दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील अनेक ग्राहकांना जवळपास आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतरही स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्याने गृहीणींच्या स्वयंपार घरातील अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने स्वयंपाकाच्या गॅसचा पुन्हा काळाबाजार बोकळाल्याची साशंकता शहरवासियांमध्ये निर्माण होत आहे.
नाशिक : शहरात गेल्या महिनाभपासून ऐन लग्नसराईच्या काळात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना आठ दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील अनेक ग्राहकांना जवळपास आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतरही स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्याने गृहीनींच्या स्वयंपार घरातील अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने स्वयंपाकाच्या गॅसचा पुन्हा काळाबाजार बोकळाल्याची साशंकता शहरवासियांमध्ये निर्माण होत आहे.
महापालिका परिसरात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना गेल्या आठवड्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑनलाइन नंबर लावूनही गॅस मिळत नसताना गॅस वितरकांक डून मात्र ग्राहकांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने कंपनीच्या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधणाºया ग्राहकांनाही समाधानकारक उत्तर मिळत नसून केवळ तक्रार नोंदवून घेण्याचे सोपस्कार पूर्ण होत असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे. या दिवसांमध्ये लग्नकार्य असलेल्या कटुुंबियांमध्ये गॅसचा वापर वाढत असल्याने सिलिंडरची मागणीही वाढते. परंतु, गॅस वितरकांकडून कं पनीकडूनच सिलिंडर मिळत नसल्याचे सांगत ग्राहकांच्या समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे शहरवासियांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, काही वितरकांनी वास्तविकतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत केवळ दोन ते तीन दिवस प्रतिक्षा करावी लागत असल्याचे सांगितले. मात्र कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीने ऑनलाईन संभाषणात नाशिकमध्ये टंचाई असल्याचे सांगतानाच ग्राहकांना किमान आठवडाभर सिलिंडरसाठी मान्य केले.
ऑनलाईन पेमेंट बनले डोके दुखी
स्वयंपाकाचा गॅस वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ऑनलाईन बुकींग व ऑनलाईन पेमेंटच्या प्रणालीसोबत सबसिडीची रक्कमही ऑनलाईन खात्यावर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे ऑनलाईन सिंलिंडर मिळण्यास आठ दिवसांहून अधिक कालावधी लागतो. या काळात सिलिंडरच्या किंमतीत चढ उतार झाल्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त रक्कम रोखीत वितरकांना द्यावी लागते. त्याचप्रमाणे जोपर्यंत सिलिंडर मिळत नाही, तोपर्यंत पैसेही अडकून राहतात. त्यामुळे नागरिकांसाठी ऑनलाईन पेमेंट करणे अधिक डोकेदुखीचे बनले आहे.
उज्वला योजनेविषयी साशंकता
केंद्र सरकारकडून एकीकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी कटुंबांना स्वयंपाकाच गॅस सिलिंडर मोफ त उपलब्ध करून दिल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे ऑनलाईनद्वारे आगाऊ बील देऊनही ग्राहकांना आठवडाभर गॅस सिलिंडरसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये सरकारच्या मोफत गॅस योजनेविषयीही साशंकता निर्माण झाली आहे.