गुन्हेगार उमेदवारांची यादी पोलिसांकडून जाहीर

By Admin | Published: February 12, 2017 12:46 AM2017-02-12T00:46:32+5:302017-02-12T00:46:49+5:30

४गुन्हेगार उमेदवारांची यादी पोलिसांकडून जाहीर

The list of criminal candidates released by the police | गुन्हेगार उमेदवारांची यादी पोलिसांकडून जाहीर

गुन्हेगार उमेदवारांची यादी पोलिसांकडून जाहीर

googlenewsNext

 नाशिक : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारांकडून प्रचारास जोर आला आहे़ महापालिकेतील लोकप्रतिनिधी निवडताना मतदारांनी उमेदवारांचे चारित्र्य व दाखल गुन्ह्यांची माहिती मिळावी यासाठी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी परिमंडळ दोनमधील उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच जाहीर केली आहे़
पोलिसांनी जाहीर केलेल्या या यादीत महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची जंत्रीच देण्यात आली आहे़ यामध्ये गंभीर तसेच राजकीय गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे़ उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याचे या यादीवरून समोर आले आहे़ तर मनसे, काँग्रेस, व राष्ट्रवादी, रिपाइं या पक्षांमधील उमेदवारावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़
पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशान्वये ही यादी जाहीर करण्यात आली असून, यामुळे मतदारांना उमेदवारांवरील गुन्ह्यांची माहिती व योग्य व्यक्तीला निवडणून देण्यासाठी मतद होणार आहे़ महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांसह सराईत गुन्हेगारांची दैनंदिन हजेरी सुरू करण्यात आली आहे़ दरम्यान उमेदवारांवर दाखल गुन्हे जाहीर करण्याचा हा प्रथमच प्रयोग असून, मतदानाच्या दिवशीही मतदान केंद्राबाहेर ही यादी लावण्यात येणार आहे़
(प्रतिनिधी)

नाशिकरोड पोलीस ठाणे : पवन पवार (अपक्ष) : ९ गुन्हे, अशोक सातभाई (शिवसेना) : ५ गुन्हे, विशाल संगमनेरे (भाजपा) : ५ गुन्हे, संतोष साळवे (शिवसेना) : ३ गुन्हे, संदीप काकळीज (काँग्रेस) : २ गुन्हे, सुनील कांबळे (रिपाइं) : ६ गुन्हे, हरिश भडांगे (अपक्ष) : ३ गुन्हे, संतोष कांबळे (अपक्ष) : ४ गुन्हे, विकी खेलुस्कर (राष्ट्रवादी काँग्रेस) : १ गुन्हा, बापू सोनवणे(एमआयएम) : १ गुन्हा, अंबादास ताजनपुरे (शिवसेना) : ५ गुन्हे, सत्यभामा गाडेकर (शिवसेना) : ४ गुन्हे,
४अंबड पोलीस ठाणे : कैलास चुंबळे (शिवसेना) : १ गुन्हा, राजेंद्र महाले (राष्ट्रवादी काँग्रेस) : १ गुन्हा, प्रवीण तिदमे (शिवसेना) : १ गुन्हा, सुधाकर बडगुजर (शिवसेना): ८ गुन्हे, अतुल सानप (मनसे) : १ गुन्हा, दिलीप दातीर (शिवसेना) : १ गुन्हा, संगीता आव्हाड (काँग्रेस) : १ गुन्हा, गणेश मोरे (मनसे): १ गुन्हा, दीपक दातीर (शिवसेना) : १ गुन्हा, सुमन सोनवणे (शिवसेना) : १ गुन्हा, लक्ष्मण जायभावे (काँग्रेस) : १ गुन्हा, मुकेश शहाणे (भाजपा) : १ गुन्हा
४उपनगर पोलीस ठाणे : माधुरी भोळे (अपक्ष) : १ गुन्हा, राहुल दिवे (काँग्रेस) : ५ गुन्हे, प्रशांत दिवे (शिवसेना) : ४ गुन्हे, शशिकांत उन्हवणे (काँग्रेस) : ९ गुन्हे, संजय भालेराव (बसप) : ५ गुन्हे, कुंदा सहाणे (अपक्ष) : १ गुन्हा, शैलेश ढगे (शिवसेना): ३ गुन्हे, रवीकिरण घोलप (अपक्ष) : १ गुन्हा, गिरीश मुदलियार (शिवसेना) : १ गुन्हा, संभाजी मोरुस्कर (भाजपा) : २ गुन्हे, अस्लम मणियार (मनसे) : ६ गुन्हे, सूर्यकांत लवटे (शिवसेना) : ५ गुन्हे, महेश आव्हाड (अपक्ष) : १ गुन्हा, केशव पोरजे (शिवसेना) : १ गुन्हा, चंद्रकांत साडे (राष्ट्रवादी काँग्रेस) : ४ गुन्हे़
४इंदिरानगर पोलीस ठाणे : पद्मिनी वारे (मनसे) : १ गुन्हे, भगवान दोंदे (भाजपा) : १ गुन्हे, सुदाम कोंबडे (भाजपा) : १ गुन्हे , सुदाम डेमसे (शिवसेना) : १ गुन्हे
४सातपूर पोलीस ठाणे : प्रकाश लोंढे (रिपाइं - अ‍े) : ९ गुन्हे, योगेश शेवरे (म न से): ६ गुन्हे, सीताराम ठोंबरे (सीपीआय) : ६ गुन्हे.
४परिमंडळ - १ सरकारवाडा पोलीस ठाणे : अजय बोरस्ते (शिवसेना) : १० गुन्हे, नरेंद्र पवार (भाजपा) : १ गुन्हा, सत्यम खंडाळे (मनसे) : ४ गुन्हे, विनोद सोळंकी (राष्ट्रवादी) : १ गुन्हा, मधुकर हिंगमिरे (अपक्ष) : १ गुन्हा, राकेश साळुंके (अपक्ष) : २ गुन्हे, समीर कांबळे (काँग्रेस) : १ गुन्हा, हेमलता पाटील (काँग्रेस) : १ गुन्हा, शैलेश कुटे (काँग्रेस) : ४ गुन्हे, वत्सला खैरे (काँग्रेस) : १ गुन्हा, गजानन शेलार (राष्ट्रवादी) : १ गुन्हा.
४ पंचवटी पोलीस ठाणे : हेमंत शेट्टी (भाजपा) : ६ गुन्हे, गौरव गोवर्धने (राष्ट्रवादी) : १ गुन्हा, भगवान भोगे (शिवसेना पुरस्कृत) : ३ गुन्हे, कविता कर्डक (राष्ट्रवादी) : १ गुन्हा, चांगदेव गुंजाळ (अपक्ष) : २ गुन्हे, अशोक मुर्तडक (मनसे) : १ गुन्हा.
४ भद्रकाली पोलीस ठाणे :- संजय चव्हाण (शिवसेना पुरस्कृत) : ३ गुन्हे, ईश्वर कदम (अपक्ष) : १ गुन्हा, गजानन शेलार (राष्ट्रवादी) : १ गुन्हा, दीपक डोके (एमआयएम) : १ गुन्हा, नासीर पठाण (अपक्ष) : ११ गुन्हे, मृणाल राजे घोडके (अपक्ष) : ६ गुन्हे, सुफियान जीन (राष्ट्रवादी) : १ गुन्हा, गंगुबाई गुडेकर (अपक्ष) : १, सचिन मराठे (शिवसेना) : ३ गुन्हे.
४ गंगापूर पोलीस ठाणे :- अरुण पाटील (अपक्ष) : १ गुन्हा, अमर काळे (अपक्ष) : १ गुन्हा, आकाश पवार (अपक्ष) : १ गुन्हा, दिनकर पाटील (भाजपा) : ८ गुन्हे, संतोष गायकवाड (अपक्ष) : ४ गुन्हे, सचिन मंडलिक (राष्ट्रवादी) : ३ गुन्हे, शिवाजी गांगुर्डे (भाजपा) : ३ गुन्हे, पद्मा वाघ (अपक्ष) : १ गुन्हा, सुरेश पाटील (अपक्ष) : १ गुन्हा, ज्वाला शिंदे (अपक्ष) : १ गुन्हा.
४ म्हसरूळ पोलीस ठाणे :- विशाल कदम (शिवसेना) : १ गुन्हा, दामोदर मानकर (भाजपा) : १ गुन्हा, गणेश धोत्रे (अपक्ष) : १ गुन्हा.
४ आडगाव पोलीस ठाणे :- विशाल ऊर्फ बंटी कोळी (मनसे) : गुन्हे, अनंत सूर्यवंशी (मनसे) : १ गुन्हा, सिद्धेश्वर अंडे (शिवसेना) : १ गुन्हा, उद्धव निमसे (भाजपा) : २ गुन्हे, संदीप भवर (मनसे) : १ गुन्हा़

Web Title: The list of criminal candidates released by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.