अकरावीसाठी दुसरी यादी जाहीर
By Admin | Published: June 28, 2016 12:23 AM2016-06-28T00:23:59+5:302016-06-28T00:24:14+5:30
प्रवेशप्रक्रिया : आरवायके ९२.६६, केटीएचएम ८९.६० टक्क्यांना प्रवेश बंद
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी सोमवारी (दि. २७) संवर्गनिहाय द्वितीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीनुसार आरवायके महाविद्यालयात खुल्या प्रवगार्तील ९२.६६ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळणार असून, वाणिज्य शाखेच्या गुणवत्ता यादीत ८३.८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाच समावेश होऊ शकला. तर केटीएचएम महाविद्यालयात ८९.६० टक्के गुणांना विज्ञान शाखेचे व वाणिज्य शाखेसाठी ७८.८० टक्के गुणांना प्रवेश बंद झाले. कला शाखेसाठी बहुतेक महाविद्यालयांनी प्रवेश खुले केले आहे.
अकरावी प्रवेशाच्या प्रथम यादीनुसार शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. उवर्रित जागांसाठी सोमवारी संध्याकाळी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, खुल्या प्रवर्गासाठी व्ही. एन. नाईक महाविद्यालयात ८९.८० टक्के गुणांना विज्ञान शाखेचे प्रवेश बंद झाले, तर वाणिज्य शाखेसाठी ६६.४० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात विज्ञानसाठी ८४.०२, तर वाणिज्यसाठी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. दुसऱ्या यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ जून संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ मिळणार असून, त्यानंतर उवर्रित जागांसाठी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. तिसऱ्या यादीनुसार २९ जूनला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. (प्रतिनिधी)