यादीत धनिक व्यक्तींचा समावेश
By Admin | Published: February 27, 2016 10:24 PM2016-02-27T22:24:41+5:302016-02-28T00:04:00+5:30
दारिद्र्यरेषेखालील : कुटुंबांच्या सर्वेक्षणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार
मनमाड : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे करताना खऱ्या लाभार्थींना डावूलन धनदांडग्यांना प्राध्यान देऊन त्यांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दारिद्र्यरेषची जुनी यादी १९९७ -१९९८ तयार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २००६ -२००७ मध्ये सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी खऱ्या लाभार्थींना लाभापासून दूर ठेवण्यात आले असून, धनदांडग्यांची नावे दारिद्र्यरेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
तरी शासनाने गरिबाची हेळसांड थाबंवावी तसेच जे खरे
लाभार्थी असतील त्यांची नावे रितसर दारिद्र्यरेषेखालीली यादीत नोंदवावी व बोगस नावे यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यवाही न झाल्यास रिपाइंच्या वतीने आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर रिपाइंचे ज्येष्ठ नेते गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह अनेक कार्य-कर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)