अक्षयतृतीयाचा मुहूर्त सुनासुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:03 AM2020-04-27T00:03:02+5:302020-04-27T00:03:31+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही बाजारपेठेत कोरोनाच्या सावटामुळे शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसला.

Listen to the moment of Akshay Tritiya | अक्षयतृतीयाचा मुहूर्त सुनासुना

सराफ बाजारात शुकशुकाट.

googlenewsNext
ठळक मुद्देउलाढाल ठप्प : सराफ, वाहनबाजार मुहूर्तावरही बंदच

नाशिक : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही बाजारपेठेत कोरोनाच्या सावटामुळे शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसला.
केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री काही दुकाने उघडण्यास परवानगीही दिल्यानंतर शहरातील काही दुकाने शनिवारपासून उघडण्याची नाशिककरांना आशा होती, परंतु, जिल्हा प्रशासनाकडून दुकाने उघडण्याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना मिळाली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, राज्य सरकारने तूर्तास जीवनावश्यक मालाचा पुरवठा करणाºया दुकानांव्यतिरिक्त अन्य दुकाने उघडण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही शहरातील सराफबाजार व वाहनबाजारातील रविवारी व्यवहारही ठप्पच राहिले. कोरोनामुळे शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एकाही वाहनांची डिलिव्हरी होऊ शकलेली नव्हती. हीच परिस्थिती अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही कायम असल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले, तर सराफबाजारातही गेल्या महिनाभरापासून शुकशुकाट असून, सराफबाजार व वाहनबाजारासह नाशिकमधील बाजारपेठेला गेल्या महिनाभरात हजारो कोटींचा फटका बसला आहे.
दरवर्षी अक्षयतृतीयाला नवीन वाहने खरेदी केली जाते यंदा मात्र कोरोनाचा फटका बसल्याने वाहनबाजारातील उलाढालही ठप्प होती. बंद कायम असल्यामुळे उलाढाल होऊ शकली नाहीच शिवाय ज्यांनी यापूर्वी बुकिंग करून ठेवलेली आहे त्यांनीदेखील गाडीची डिलेव्हरी मागितलेली नाही. संपूर्ण बाजारपेठेवर कोरोनाचा परिणाम दिसून आला.
४कोरोनामुळे शहरातील सराफ बाजार व वाहन बाजार बंद असला तरी काही ग्राहकांनी त्यांच्या पारंपरिक सराफांना संपर्क साधून मुहूर्त साधण्यासाठी आॅनलाइन बुकिंग करण नाममात्र सोन्याची खरेदी केली. त्यामुळे वायदे बाजारात सोन्याच्या भावाने उसळी घेतली असून, सोन्याचे भाव ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने सोन्याला झळाळी प्राप्त झाली आहे.

Web Title: Listen to the moment of Akshay Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.