साहित्यकारणातील अर्थव्यवहार कोरोनाने उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:33 AM2021-12-05T01:33:52+5:302021-12-05T01:34:24+5:30
कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादातून उमटला.
नाशिक : कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले
नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादातून उमटला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी कुसुमाग्रजनगरीमध्ये शनिवारी (दि.४) कोरोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी
साहित्य व्यवहार या विषयावर विविध तज्ज्ञ व विचारवंतांनी एकत्र येत आपल्या विचारांद्वारे मंथन घडवून आणले. साहित्यिक तथा ज्येष्ठ
पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, डॉ. आशुतोष रारावीरकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश
भटेवरा, डॉ. हंसराज जाधव, अभिनेता व लेखक दीपक करंजीकर, सुरेश भटेवरा, राहुल रनाळकर यांनी सहभाग घेतला.
जगात १९३० मध्ये आर्थिक मंदी आली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी
देशाच्या चलनाबरोबर सोन्याच्या साठ्याचा समन्वय तोडण्यात आला. त्यामुळे
आगामी काळात सर्व देशांची सरकारे कर्जबाजारी झाली. चीनने संपूर्ण जगाची बाजारपेठ काबीज
केली आहे. मात्र आता कोरोनानंतर भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
टाकले आहे, असे विनायक गोविलकर यावेळी म्हणाले. कोरोना काळात अर्थशास्त्राचे महत्त्व वाढले आहे. अर्थकारण उत्पादन,
तंत्रज्ञान, वितरण या तीन गोष्टीभोवती फिरत असते. कोविड काळात आधुनिक
तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्याचे आशुतोष रारावीरकर म्हणाले. २०१४ सालापासून देशाचे अर्थकारण बिघडले. नोटबंदी आणि जीएसटीचा मोठा झटका
सहन करताना त्यामधून अर्थव्यवस्था सावरत नाही तोच कोरोनाची आपत्ती आली. या काळात नोकरदार, उद्योजक, गृहिणी,
शेतकरी, कामगार असे सर्वच वर्ग त्रस्त आणि निराश आहेत. नोटबंदीसाठी
सांगितलेली सर्वच कारणे फोल ठरल्याने हा निर्णय सपशेल फसला. काळा पैसा
देशात आणायचा सोडून अनेकजण कर्ज काढून देश सोडून पळाल्याची टीका पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केली. ---
-इन्फो---
कोरोनाचे उद्ध्वस्तीकरण साहित्यातही...!
देशात बेकारी, द्रारिद्र्य, महागाई, विषमता वाढली हे खरेच आहे. कोरोनाने
केलेल्या उद्ध्वस्तीकरण आता साहित्यात उतरू लागले आहे. जगायचे कसे हा
प्रश्न असतानाच साहित्य निर्मिती आणि वाचन हा दुय्यम भाग झाला आहे. लेखन
आणि वाचन या एकांतात चालणाऱ्या गोष्टी आहेत. कातडीबचावपणा
साहित्यनिर्मिती करू शकत नाही. कोरोनानंतर माणसाचा शोध
सुरू असून अर्थकारण चाचपडत आहे. माणसं पुन्हा एकत्र येण्यासाठी
साहित्याची गरज असून संवाद प्रक्रिया वाढायला हवी, असे मत जयदेव डोळे यांनी यावेळी मांडले.