मराठीचा कायदा करण्यासाठी सरसावले साहित्यिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 03:13 PM2019-06-01T15:13:44+5:302019-06-01T15:29:29+5:30
नाशिक- मराठी भाषा वाचवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला असून सर्व शाळात मराठी सक्तीची करावी यासाठी यासाठी येत्या राज्य विधी मंडळ अधिवेशनाच्या वेळी मराठी साहित्यिक तसेच अन्य मराठी संस्था धरणे धरणार आहेत.
नाशिक-मराठी भाषा वाचवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला असून सर्व शाळात मराठी सक्तीची करावी यासाठी यासाठी येत्या राज्य विधी मंडळ अधिवेशनाच्या वेळी मराठी साहित्यिक तसेच अन्य मराठी संस्था धरणे धरणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यासंदर्भात नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विधी मंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर १७ किंवा १८ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत ५ जून रोजी मराठीशी संबंधीत विविध संस्थांची बैठक होणार आहे. यात रूपरेषा ठरणार आहे.
मराठी भाषेची अवस्था केवळ बिकट होत चालली आहे. असे म्हणून चालणार नाही. मराठी भाषा टिकवण्यसाठी प्रयत्न झाले पाहिजे. केरळ, तेलंगाणा या सारख्या राज्यात तेथील मातृभाषा शिकवण्यासाठी कायदा केला आहे. त्या धर्तीवरच महाराष्टÑात कायदा करावा यासाठी मराठी संघटना आग्रही आहेत. त्याच बरोबर मराठीचा वापर होतो आहे किंवा नाही याचे नियमन करण्यासाठी देखील मराठी भाषा प्राधीकरण केले पाहिजे, अशी प्रामुख्याने मागणी आहे.