साधेपणाने व्हावे साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:48 AM2019-06-08T00:48:22+5:302019-06-08T00:48:56+5:30
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना नाशिकनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यावे यासाठी साकडे घातले आहे. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे साधेपणाने आणि कमी खर्चात व्हावे़
नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना नाशिकनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यावे यासाठी साकडे घातले आहे. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे साधेपणाने आणि कमी खर्चात व्हावे़
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीचा विचार केल्यास आणि नाशिकनगरीत अखिल भारतीय पातळीवरील मराठी साहित्य संमेलन झाल्यास नाशिक शहरासह जिल्ह्याच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळ वाढीला चालना मिळणार आहे.
सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावाना हे नाशिक शहरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्र मानले जाते. नाशिक शहराला मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाल्यास नाशिक शहराच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळणार आहे. या शहराला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, आदींसह अनेक मान्यवर साहित्यिकांची परंपरा लाभलेली आहे. सावानामार्फत सातत्याने विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नाशिकला साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाल्यास सावाना आपली जबाबदारी चांगल्या रितीने पार असा विश्वास वाटतो. परंतु नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन साधेपणाने साजरे व्हावे अशी माझी अपेक्षा आहे़
नाशिक येथे यापूर्वीदेखील साहित्य संमेलन साजरे झाले होते, पंरतु त्यावेळी थोडाफार वाद झाला होता़ यापुढे साहित्य संमेलन झाल्यास कमी खर्चात आणि साधेपणाने साजरे करण्यात यावे़ तसेच संमेलन अध्यक्ष म्हणून नाशिकमधीलच एखाद्या ज्येष्ठ लेखकाची निवड करण्यात यावी़ कारण आता साहित्य संमेलनाची निवडणूक पद्धत बंद झाल्याने बिनविरोध निवड करण्याची पद्धत सुरू झाली आहे़ या संमेलनासाठी फारसा खर्च येणार नाही कारण यासाठी आवश्यक असणाºया सर्व सोयीसुविधा आणि सभागृहासह साधनसामग्री सावानाकडे उपलब्ध आहेत़ - चंद्रकांत महामिने