साडेचार हजार केंद्रांवर पोहोचले साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:17 AM2019-10-21T00:17:08+5:302019-10-21T00:37:13+5:30
विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या राष्टÑीय कर्तव्यावर मुक्कामी हजर झाले आहेत.
नाशिक : विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या राष्टÑीय कर्तव्यावर मुक्कामी हजर झाले आहेत.
राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसांठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, त्यात जिल्ह्यातील १५ मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघासाठी रविवारी सकाळी मतदान साहित्यांचे वाटप करण्यात आले. नांदगाव येथील मतदारसंघासाठी नवीन प्रशासकीय इमारत, मालेगाव मध्यसाठी शिवाजी जिमखाना, मालेगाव बाह्यसाठी महाराष्टÑ राज्य वखार महामंडळाचे गुदाम, बागलाणसाठी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवणमधील नवीन प्रशासकीय मंडळ, चांदवड येथील प्रशासकीय इमारत, येवला, सिन्नर येथील तहसील कार्यालये, निफाडचे कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालये, दिंडोरीतील मविप्र महाविद्यालय, नाशिक पूर्वसाठी विभागीय क्रीडा संकुल, नाशिक मध्येसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक पश्चिमसाठी छत्रपती संभाजी स्टेडियम, देवळालीतील विभागीय मनपा कार्यालय, तर इगतपुरी येथील मतदान केंद्रासाठी नाशिक शहरातील शिवाजी स्टेडियम येथून मतदान साहित्यांचे वाटप करण्यात आले.
सकाळी ९ वाजेपासून मतदान कर्मचारी अ ापापल्या साहित्य वाटप केंद्रावर मतदानाचे साहित्य घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यांना नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या हवाली साहित्य करण्यात आले. केंद्रातून मिळालेले साहित्य घेऊन कर्मचारी दुपारनंतर आपापल्या केंद्रांवर रवाना झाले. कर्मचारी व मतदानाच्या साहित्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ५०४ बसेस आणि खासगी १,३७३ बसेसच्या माध्यमातून कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले.
१३०० खासगी वाहनांचा वापर
मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचाºयांना खासगी वाहनेदेखील पुरविण्यात आली. सुमारे १३०० खासगी वाहनांतून कर्मचाºयांना त्यांच्या केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. ईव्हीएम मशीन सुरक्षित नेण्यासाठी ५०४ बसेसला प्राधान्य देण्यात आले. शिवाय १०४ खासगी मिनी बसेसचादेखील वापर करावा लागला. १,२४६ जीपचा वापर अधिकाºयांसाठी करण्यात येणार आहे. सुमारे २३ ट्रकांचा वापर अन्य साहित्य वाहण्यांसाठी करण्यात आला.
मतदान कर्मचाºयांना मेणबत्ती, मच्छर अगरबत्ती
मतदान केंद्रांवर मुक्कामी राहणाºया कर्मचाºयांना मेणबत्ती, माचीस तसेच मच्छर अगरबत्तीदेखील देण्यात आली असून, पावसामुळे कोणत्याही मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची मदतीची गरज लागल्यास मतदान केंद्रावरील अधिकारी तसेच ग्रामंपाचायत, नगरपालिका आणि महापालिकांना तातडीने सुविधा पुरविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.
फ्लाइंग स्कॉडसाठी स्वतंत्र व्यवस्था
मतदान साहित्य घेऊन जाणाºया कर्मचाºयांव्यतिरिक्त फ्लाइंग स्कॉड, व्हिडीओ शूटिंग, सूक्ष्म निरीक्षक यांच्याकरिता ४९ खासगी वाहने अधिग्रहित करण्यात आली होती. या वाहनांचा वापर मतदानाच्या दिवशी फिरतीवरील गस्तीसाठी करण्यात येणार आहे.