साहित्य सावाना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 17:02 IST2018-08-31T17:02:16+5:302018-08-31T17:02:36+5:30

राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास

Literature Savana Diwali Ankala State Level First Prize | साहित्य सावाना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

साहित्य सावाना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास

नाशिक - मुंबई मराठी पत्रकार संघ व रामशेठ ठाकूर विकास मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत दिवाळी अंक - 2017 राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास प्रदान करण्यात आले. अ. भा. मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र
वाबळे, आ. प्रशांत ठाकूर, जेष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, दीपक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे झालेल्या समारंभात रु . ३७,५००/- चा धनादेश, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ अशा स्वरूपात सदर पुरस्कार देण्यात आला. साहित्य सावानाचे संपादक व सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, उपाध्यक्ष किशोर पाठक, सहाय्यक सचिव अ‍ॅड. भानुदास शौचे , सांस्कृतिक कार्यासचिव प्रा. डॉ. शंकर बो-हाडे,
वसंत खैरनार, बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बदलते युग लक्षात घेऊन दिवाळी अंकातील मजकूर अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा या करिता छापील अंकांबरोबरच ई दिवाळी अंकदेखील प्रसिद्ध करावा अशी सूचना प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमख यांनी यावेळी केली.

Web Title: Literature Savana Diwali Ankala State Level First Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.