जीना यहॉँ, मरना यहॉँ...
By Admin | Published: September 11, 2014 10:02 PM2014-09-11T22:02:54+5:302014-09-12T00:09:17+5:30
जीना यहॉँ, मरना यहॉँ...
: ‘ना घर होते ना गणगोत, चालेल तेवढी पायाखालची जमीन होती, दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती...’ कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘विद्यापीठा’शी नाते सांगणाऱ्या निराश्रितांना कसली आली जगण्याची भ्रांत? दिवसा मिळेल ते पोटात ढकलायचे आणि रात्र झाली की जागा मिळेल तेथे घ्यायचा विसावा असे जगणे ज्यांच्या वाट्याला आले ते विसरून जातात मरणाची भीती. मालेगाव येथील कायम अपघात होणाऱ्या जुना मुंबई- आग्रा महामार्गावरील रस्ता दुभाजकावर निद्राधीन झालेल्या व्यक्ती.