जीवनगाणे गातच राहावे...
By sandeep.bhalerao | Published: September 10, 2018 06:32 PM2018-09-10T18:32:32+5:302018-09-10T18:33:02+5:30
शर्वाणीच्या आवाजातील जादूलहानपणी एक सुरात गाणे म्हणणारी शर्वाणी आयुष्यात गाण्यातूनच नवी ओळख निर्माण करेल, असे वाटले नव्हते; परंतु आता तिच्या गाण्यातील प्रगती पाहता ती ध्येयाकडे नक्कीच पोहचेल, असे एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व आकार घेत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात; परंतु नैसर्गिकरीत्या ज्यांच्या नशिबी अपंगत्व येते त्यांच्यासाठी जीवनप्रवास करणे इतरांइतके सोपे नक्कीच नसते. शर्वाणी कबाडी या मल्टिपल डिसअॅबल मुलीने मात्र इतरांनाही प्रेरणादायी ठरेल, अशी जिद्द बाळगली असून, ती आता गायन क्षेत्रात लक्ष वेधून घेत आहे.

वय वर्ष १८, शर्वाणी कबाडे हिने गायनाची पहिली परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण करून आपल्यातील कर्तृत्व सिद्ध केले आहे. अर्थात हा प्रवास काही एकाकी घडलेला नाही. त्यामागे तिची जिद्द आणि आई डॉ. राजश्री कबाडे यांची मेहनत आहे. लहानपणापासूनच शर्वाणीचा गोड गळा असल्याची बाब डॉ. राजश्री यांच्या लक्षात आली. त्याचवेळी त्यांनी तिच्यातील गायन कौशल्याला पैलू पाडण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी अनेकांकडे विचारणा केली; मात्र सहजासहजी होकार कुठूनच मिळत नव्हता. अशातच नॅब डिसअॅबल सेंटरच्या शुक्ल यांनी राजश्री कबाडे यांना बोहोरपट्टीतील जोशी सर यांच्याकडे पाठविले. त्यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळे उभारी मिळाली आणि त्यांनी गायन शिक्षक योगेश जाधव यांना घरीच शर्वाणीची शिकवणी सुरू केली. शर्वाणीच्या आवाजातील गोडवा पाहून कुटुंबातील सर्वच खूश झाले. सरांनाही तिच्यात कौशल्य दिसले आणि त्यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले. शर्वाणीला वेळोवेळी सक्षम आधार मिळाल्याने तिच्यातील कमतरता कमी होऊन ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम झाली आहे.