श्रीक्षेत्र केदारनाथ येथील मंदिर जीर्णोद्धाराचे त्र्यंबकेश्वरला थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 12:15 AM2021-11-09T00:15:20+5:302021-11-09T00:15:50+5:30

त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतातील बारा ज्योतिर्लिंगासह ८२ ठिकाणी दाखविण्यात आले.

Live project of temple renovation at Shrikshetra Kedarnath to Trimbakeshwar | श्रीक्षेत्र केदारनाथ येथील मंदिर जीर्णोद्धाराचे त्र्यंबकेश्वरला थेट प्रक्षेपण

श्रीक्षेत्र केदारनाथ येथील मंदिर जीर्णोद्धाराचे त्र्यंबकेश्वरला थेट प्रक्षेपण

googlenewsNext
ठळक मुद्देआद्य शंकराचार्यांच्या समाधी, मूर्ती अनावरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतातील बारा ज्योतिर्लिंगासह ८२ ठिकाणी दाखविण्यात आले.

त्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे मंडप उभारण्यात येऊन तेथे भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण दाखविण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.
आद्य शंकराचार्य यांची समाधी व मूर्तीचा अनावरण सोहळा पाहण्याचे व त्यात सहभागी होण्याचे भाग्यही मला लाभले. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असे हा सोहळा संपन्न झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

राज्य सरकारने दहा-बारा रुपये कमी करावेत
केंद्राने पेट्रोल, डिझेलचे भाव पाच रुपयांनी उतरवले, राज्यात त्याची अंमलबजावणी होईल का? असे विचारताच फडणवीस यांनी त्यावर का नाही होणार? केंद्राने भाव उतरवले तर आपोआप राज्यात भाव कमी होतील. आणि राज्य सरकारने दहा-बारा रुपये कमी करावेत, असे ते म्हणाले.

सन २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये भूकंप, भूस्खलन व बर्फ वितळून जी नैसर्गिक आपत्ती ज्योतिर्लिंग केदारनाथ मंदिर व परिसरावर आली होती. त्यावेळेस केदारनाथ मंदिराजवळ असलेल्या आद्य शंकराचार्य समाधी व मूर्तीदेखील या नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाल्या होत्या. प्रधानमंत्री मोदी यांनी वैभव संपन्न केदारनाथ मंदिर व आद्य शंकराचार्य समाधी व मूर्ती पुनश्च जैसे थे तयार करून या स्थळाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ असा निश्चय त्यांनी केला होता तो पुर्णत्वास आल्याचे फडणवीस म्हणाले.
यावेळी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात त्र्यंबकेश्वरमधील सर्व आखाड्यांचे साधू, संत, महंत, ठाणापती व मान्यवर अतिथी थेट प्रक्षेपण पाहात होते.

त्र्यंबकेश्वर येथील थेट प्रक्षेपण प्रसंगी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सायली शिखरे, स्वप्निल शेलार, समीर पाटणकर, विष्णू दोबाडे, दीपक लोणारी, अशोक घागरे, हर्षल शिखरे, नितीन रामायणे, शिल्पा रामायणे, सागर उजे आदी उपस्थित होते. 

Web Title: Live project of temple renovation at Shrikshetra Kedarnath to Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.