४५६ मतदान केंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:42 AM2019-10-21T00:42:07+5:302019-10-21T00:44:01+5:30

पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या सर्व हालचालींवर निवडणूक अधिकारी कार्यालयात बसून लक्ष ठेवणार आहेत.

'Live webcasting' of 5 polling stations | ४५६ मतदान केंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्टिंग’

४५६ मतदान केंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्टिंग’

Next

नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या सर्व हालचालींवर निवडणूक अधिकारी कार्यालयात बसून लक्ष ठेवणार आहेत.
निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, तर पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार मतदान केंद्रांवर पूर्णपणे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हातील आदिवासी, ग्रामीण भागात अशी अनेक मतदान केंद्रे आहेत की जेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचा संपर्क निर्माण होत नाही. अशा केंद्रांवरील मतदानाची अधिक काळजी जिल्हा प्रशासनाला आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण आणि चांदवड या मतदारसंघांमध्ये अशी अनेक मतदारसंघ आहेत की जी संपर्काच्या कक्षेत येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पावसामुळे तर त्यात अधिकच अडचण निर्माण झाल्याने या सर्व केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याठी लाइव्ह वेबकास्ंिटग केले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून याबाबतची कार्यवाही सुरू होती. येथील यंत्रणा मतदान अधिकाऱ्यांच्या कक्षेत जोडण्यात आली आहे.
रेंज नसलेल्या केंद्रांना मतदान अधिकाऱ्यांच्या कक्षेशी जोडण्यासाठी शनिवारी तयारी पूर्ण करण्यात आली. वीज तसेच इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. सदर मतदान केंद्रापासून रेंज असलेल्या ठिकाणी अधिकारी या केंद्रांवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक मतदान कक्षातील मतदारांच्या हालचालींवर लक्ष या माध्यमातून ठेवले जाणार आहे.





या अधिकाºयांची नजर संबंधित केंद्रावर राहणार आहे. ही अतिशय प्रभावी यंत्रणा असून, केंद्रातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याचा उत्तम मार्ग असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

Web Title: 'Live webcasting' of 5 polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.