विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:30 PM2017-10-05T23:30:54+5:302017-10-06T00:14:07+5:30
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा बिबट्या खोल विहिरीत पडला होता. विहिरीतील पाणी आटविल्यानंतर बिबट्याने आज विहिरीतून जंगलाकडे धूम ठोकली.
सटाणा : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा बिबट्या खोल विहिरीत पडला होता. विहिरीतील पाणी आटविल्यानंतर बिबट्याने आज विहिरीतून जंगलाकडे धूम ठोकली.
तिळवण येथील अनिल सुपडू गुंजाळ हे गुरूवारी सकाळी तिळवण किल्ला परिसरात असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीजवळ कृषिपंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीमधून डरकाळी फोडण्यासारखा आवाज आला. गुंजाळ यांनी विहिरीत डोकावून बघितले असता पाण्यात बिबट्या असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ बिबट्याला वाचविण्यासाठी सटाणा वन परिक्षेत्र अधिकारी वसंतराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जमाव पांगविला आणि बिबट्याला वाचविण्यासाठी विहिरीत दोरखंड बांधून बाज सोडली.